Pimpri : सरस्वती कला मंदिरचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात

एमपीसी न्यूज – सरस्वती कला मंदिरच्या वतीने हम्प्टी-डम्प्टी प्री स्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात पार पडले. यामध्ये बालचमूंनी विविध गाण्यांवर सादरीकरण केले. तसेच दिमाखदार शाही पोशाख परिधान करून ऐतिहासिक परंपरांना उजाळा दिला. रविवारी (दि. 1) हे संमेलन पिंपरी येथील आचार्य अत्रे रंगमंदिरात पार पडले.

सरस्वती कला मंदिर, हम्प्टी-डम्प्टी नर्सरी, संगणक अकॅडमी, उन्हाळी वर्गातील लहान मुलांसमवेत संस्थेचा 21 वा वर्धापन दिन साजरा करण्यात आला. कार्यक्रमासाठी ज्येष्ठ नागरिक शशिकांत देशपांडे, डॉ. श्रीपाद परसपत्की, अशोक भिंगे, ललिता देसाई, बसंती चक्रवर्ती, आशिम रॉयचोधरी, प्रा. डॉ. महेश शिंदीकर, प्रा. डॉ. माधुरी गोखले आदी उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सर्व सहभागी मुलांना सन्मानचिन्ह देऊन प्रोत्साहित केले.

‘राजवंश’ या संकल्पनेवर आधारित मुलांनी विविध भागातील राजा-राणीचे पोशाख परिधान केले. मौर्य, चोल, सिसोदिया, डोगरा आदी राजवंशातील राजा-राणींची झलक कार्यक्रमात पाहायला मिळाली. त्याशिवाय बिंबिसारा, हरियांका येथील कोसला देवी, दांती दुर्गा राष्ट्रकूटातील राणी भवंगा, रजिया सुलताना, शिवाजी महाराज, सईबाई निंबाळकर, पेशवा बाजीराव, काशिबाई आणि मस्तानी, झाशीची राणी आदी पोशाख मुलांनी परिधान केले. झुंबा, जाझ, मल्हार, जय हो आदी गाण्यांवर मुलांनी सादरीकरण केले.

देवा श्रीगणेशा आणि महिषासुरमर्दिनी या गाण्यांनी कार्यक्रमाची सुरुवात झाली. त्यानंतर कथक, भरतनाट्यम, ओडिसी तसेच भारतीय समकालीन नृत्य शैलीद्वारे भक्ती, निरागसता, उत्साह आदी भाव नृत्यामधून उमटवले. भारतीय संस्कृतीचे एकत्रित दर्शन झाल्याने उपस्थित मंत्रमुग्ध झाले. उरी हल्ल्यात शहिद झालेल्या जवानांना कार्यक्रमात श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. अर्धशास्त्रीय, लोक, रेट्रो, बॉलिवूड, देशभक्ती या पाच प्रकारांमध्ये गाण्यांचे सादरीकरण करण्यात आले. रजनीकांत शैलीत नाकामुका, केदारनाथ, तान्हाजी, चित्रपटातील गाणी, वसंत पंचमी, होळीच्या पार्श्वभूमीवर विविध रंगांचे सादरीकरण झाले.

कार्यक्रमाचे आयोजन सरस्वती कला मंदिरचे अध्यक्ष, संचालक प्रदीप कुमार बागची यांनी केले. प्रशांत कुमार यांनी सहाय्य केले. नृत्यदिग्दर्शन गायत्री पी. बागची, प्रोनेमा पी. बागची यांनी केले. निराल गवळे, तन्वी अग्रवाल, स्नेहा मांजरे, अमृता कुंढेर, ईशा जगदाळे, अन्वेशा जाना, सावरिया कुमार या बालचमूंनी सूत्रसंचालन केले. श्रुती प्रसाद, महेक कुमार, कस्तुरी जोशी, उज्ज्वला माने, नीलम कुमार, नीलिमा गव्हाळे, प्रसंजीत दनाने, विराज यादव, हृषीकेश जोशी, राहुल सिंग, अनंत शर्मा, मल्लिनाथ करकांती, सूरज करकांती, गजानन गव्हाळे, अमरनाथ स्वामी आदींनी समन्वयक म्हणून काम पाहिले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.