Ekanath Shinde : शिवसेनेच्या संपर्कातील आमदारांची नावे जाहीर करा – एकनाथ शिंदे

एमपीसी न्यूज – शिवसेनेचे बंडखोर आमदारांचे नेतृत्व करणारे एकनाथ शिंदे  (Ekanath Shinde)    यांनी शिवसेनेच्या नेतृत्वालाच आव्हान दिले आहे.आमचे कोणते आमदार तुमच्या संपर्कात आहेत त्यांची नावे सांगावीत, असे आव्हान शिंदे यांनी दिले आहे. आमचे प्रवक्ते दीपक केसरकर हे तुम्हाला आमच्या निर्णयाची माहिती देतील, असे त्यांनी स्पष्ट केले.

 

हॉटेल रॅडिसनच्या प्रवेशव्दाराजवळ येत एकनाथ शिंदे यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. गेल्या आठवड्यापासून शिवसेनेचे बंडखोर आमदार गुवाहटीमध्ये आहेत. महाराष्ट्रातील सत्ता संघर्षाच्या केंद्रस्थानी असलेले एकनाथ शिंदे यांनी गुवाहटीमध्ये प्रथमच माध्यमांसमोर आपली भूमिका स्पष्ट केली.

शिंदे म्हणाले की,इथं आलेले 50 आमदार स्वखुशीने आले आहेत. आम्ही अजूनही बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचे शिवसैनिक असल्याच्या भूमिकेचा त्यांनी पुनरुच्चार केला. आम्ही या ठिकाणी एक भूमिका घेऊन आलो आहोत.यामध्ये कोणताही स्वार्थ नाही, असा दावा एकनाथ शिंदे यांनी केला.

 

ठाकरे यांना आव्हान

गेल्या काही दिवसांपासून शिवसेनेच्या नेतृत्वाकडून गुवाहटीमध्ये शिंदे यांच्या गटातील 20 – 21  आमदार संपर्कात असल्याचा दावा केला आहे. एकनाथ शिंदे यांनी नावे जाहीर करण्याचे आव्हान दिले आहे. कोणताही आमदार बाहेरच्यांशी संपर्कात नसल्याचा दावा त्यांनी केला आहे.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.