Talegaon Dabhade News : तळेगाव दाभाडे नगर परिषदेच्या उपनगराध्यक्षपदाच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर

एमपीसी न्यूज : तळेगाव दाभाडे नगर परिषदेच्या उपनगराध्यक्षपदाच्या निवडणुकीचा कार्यक्रम पीठासन अधिकारी नगराध्यक्षा चित्रा जगनाडे यांनी जाहीर केला असून निवडणूक येत्या गुरुवारी (दि.21 जानेवारी ) रोजी होणार आहेत.

नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्षपदाचा राजीनामा वैशाली दाभाडे यांनी दिल्याने त्यांच्या रिक्तपदासाठी हि निवडणूक होत आहे. उपनगराध्यक्ष पदासाठी  इच्छुकांचे  अर्ज दि. 21 जानेवारी रोजी सकाळी 10 ते 12 वाजेपर्यंत मुख्याधिकारी स्वीकारतील. तर या अर्जांची छाननी पीठासन अधिकारी 12.00  ते 12 .15 दरम्यान  करणार आहेत. उमेदावारंना अर्ज मागे घेण्याकरिता 12.15 ते 12.30 हि वेळ देण्यात आली आहे. तर 12.30 वाजता  हात उंचाऊन मतदान प्रक्रिया पार पडणार आहे.

या निवडणुकीच्या प्रक्रियेचे व्हिडीओ चित्रीकरण करण्यात येणार आहे. यामध्ये दुपारी 12 वाजता विशेष सभेचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या निवडणुकीत उपनगराध्यक्ष पदाची माळ कोणाच्या गळ्यात पडते. याबाबत राजकीय वर्तुळात तर्क वितर्क केले जात आहेत.

सध्या नगर परिषदेतील संख्याबळ 27 असून यामध्ये भारतीय जनता पक्षाचे12, जनसेवा विकास समितीचे 7, तर तळेगाव शहर सुधारणा व विकास समितीचे 7 नगरसेवक आहेत. या शिवाय नगराध्यक्ष हे पद भाजपाकडे आहे. अश्या प्रकारे त्रिशंकू पध्दतीने नगरपरिषद कामकाज चालू आहे.

गेल्या चार वर्षाच्या काळात भारतीय जनता पक्षाकडून प्रथम उपनगराध्यक्षपद सुनील शेळके यांच्याकडे होते.दुस-यांदा जनसेवा विकास समितीचे संग्राम काकडे यांची उपनगराध्यक्ष पदावर निवड झाली होती.त्यानंतर तळेगाव शहर सुधारणा व विकास समितीच्या वैशाली दाभाडे यांची या पदावर वर्णी लागली होती. या चार वर्षामध्ये तीनही गटांना उपनगराध्यक्ष पदाची संधी मिळाली आहे.यावेळी कोणाकडे उपनगराध्यक्षपद जाते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मात्र या पदासाठी तीनही गटातील इच्छुक जोरदार प्रयत्नशीलआहेत.

जर तिन्ही गटांनी स्वतंत्र निवडणूक लढवली तर भाजपाची सरशी होऊन उपनगराध्यक्षपद भाजपाकडे जाईल. जनसेवा गटाने भाजपाशी हातमिळवणी केली तर जनसेवा विकास समितीला उपनगराध्यक्षपदाची संधी मिळू शकते. आणि जर जनसेवा आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात दिलजमाई झाली तर  शहर सुधारणा विकास समिती किंवा जनसेवा विकास समितीला संधी मिळू शकते. जनसेवा विकास समिती कोणाबरोबर जाईल यावर उपनगराध्यक्षपद अवलंबून असणार आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.