Break the Chain : ही आहे कार्यालयातील उपस्थितीबाबत नवीन नियमावली

एमपीसी न्यूज –  ‘ब्रेक द चेन’ अंतर्गत गुरुवार (दि. 22 एप्रिल) रोजी रात्री 8 वाजेपासून होणारी सुधारित नियमावली लागू होणार आहे. ही नियमावली 1 मे रोजी सकाळी सात वाजेपर्यंत लागू राहणार आहे. कोरोनाचा फैलाव वाढत असल्याने राज्य शासनाने नवीन नियमावली जाहीर केली आहे. त्यात खासगी आणि सरकारी कार्यालयातील उपस्थितीबाबत सविस्तर सांगण्यात आले आहे.

सर्व सरकारी कार्यालये (राज्य, केंद्र आणि स्थानिक प्राधिकरणाच्या अखत्यारितील) कोविड-19 व्यवस्थापनाच्या संदर्भातील थेट आपत्कालीन सेवा वगळता उर्वरित कर्मचाऱ्यांच्या 15 टक्के उपस्थितीत कामकाज करतील.

मंत्रालय तसेच मुंबई महानगर प्रदेशातील सरकारी कार्यलयांसंदर्भात महाराष्ट्र राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या परवानगीने विभागप्रमुख 15 टक्क्यांपेक्षा जास्त कर्मचारी हजेरीबद्दल निर्णय घेऊ शकतील.

_MPC_DIR_MPU_II

इतर सरकारी कार्यालयांसदर्भात विभागप्रमुख जास्त उपस्थितीबद्दलचा निर्णय स्थानिक आपत्ती व्यावस्थापन प्राधिकरणांच्या परवानगीने घेऊ शकतील. इतर सर्व कार्यालयांमधे केवळ 15 टक्के कर्मचारी

उपस्थिती किंवा एकूण पाच कर्मचारी, यापैकी जे जास्ती असेल त्यात कामकाज करतील.सर्व जीवनावश्यक सेवांसाठी लागणाऱ्या कामकाजासाठी किमान कर्मचारी संख्येत काम करावे आणि उपस्थिती कोणत्याही परिस्थितीत 50 टक्क्यांवर जाणार नाही, हे बघावे. असेही नव्या नियमावलीत म्हटले आहे.

जीवनावश्यक सेवा प्रत्यक्ष पुरवण्याच्या कामी तैनात करण्यात आलेल्या मनुष्यबळासंदर्भात किमान मनुष्यबळ वापरावे. हे मनुष्यबळ 100 टक्क्यांपर्यंतही वाढवण्याची मुभा आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.