Pune News : संतापजनक ! घरासमोर राहणाऱ्या तरुणाकडून चार वर्षीय चिमुरडीवर अत्याचाराचा प्रयत्न 

एमपीसी न्यूज : पुण्यातील वारजे पोलीस स्टेशनच्या हद्दीत एक संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे. घरासमोरच राहणाऱ्या एका तरुणाने एका चार वर्षीय चिमुरडीवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी पीडित मुलीच्या आईने तक्रार दिली असून त्यानंतर स्वागत शंकर कांबळे (वय 28) याच्या विरोधात वारजे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक केली आहे. 

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, आरोपी हा फिर्यादीच्या घराच्या समोरच राहतो. त्यामुळे त्यांची चांगली ओळख आहे. फिर्यादीचा अल्पवयीन मुलीला देखील तो चांगला ओळखतो. दरम्यान शुक्रवारी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास आरोपीने या चार वर्षीय चिमुरडीला घरामध्ये नेऊन पैशाचे आमिष दाखवत तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला.

हा प्रकार उघडकीस आल्यानंतर चिमुरडीच्या आईने पोलीस स्टेशन गाठून तक्रार दिली. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल करत आरोपीला अटकही केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.