Annu Kapoor on Nepotism : चांगल्या कुटुंबात जन्माला येण्या बरोबर टॅलेंटचीही गरज – अन्नू कपूर

You don't just have to be born into a good family, you need talent - Annu Kapoor

एमपीसी न्यूज – युवा अभिनेता सुशांतसिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर सोशल मीडियावर घराणेशाही विषयी वाद सुरु झाला. चित्रपटसृष्टीत घराणेशाही आहे त्याचा सुशांत शिकार झाला असे अनेक कलाकारांनी यानिमित्ताने सांगितले. येथे बाहेरुन आलेल्याला नेहमीच टार्गेट केले जाते असे म्हटले गेले. नेपोटिझम हे काहींनी बॉलिवूड सोडण्यामागचे कारण सांगितले.

आता ज्येष्ठ अभिनेते अन्नू कपूर यांनी घराणेशाही वादावर वक्तव्य केले आहे. त्यांना येथे कोणीही गॉडफादर नव्हता. त्यांनी आपल्या गुणांच्या जोरावर येथे वेगळे स्थान निर्माण केले आहे.

नुकतीच अन्नू कपूर यांनी एका वृत्तवाहिनीला मुलाखत दिली. त्यात त्यांना सध्या सुरु असलेल्या घराणेशाही या वादावर त्यांचे मत विचारण्यात आले होते. त्यावर ते म्हणाले, ‘जर घराणेशाही असती तर आज सनी देओल, अमिताभ बच्चन, वासु भगनानी, हरी बावेजा यांच्या सारख्या मोठ्या कलाकारांची मुले टॉम क्रूज झाली असती’.

‘बॉलिवूड मध्ये असे अनेक लोकं आहेत ज्यांनी अभिनयाच्या जोरावर स्वत:ची अशी वेगळी ओळख निर्माण केली आहे. खरे बोलायचे झाले तर घराणेशाही वगैरे काही नसते.  तुम्ही जरी एखाद्या चांगल्या कुटुंबात जन्माला आलात,  तरी सुद्धा तुमच्या स्वत:मध्ये टॅलेंट तर हवे’ असे त्यांनी पुढे म्हटले आहे.

‘एखाद्या डॉक्टर किंवा आर्किटेक्टचा मुलगा डॉक्टर किंवा आर्किटेक्ट होऊ शकतो. पण एखाद्या फिल्म स्टारने त्याच्या मुलाला किंवा मुलीला इंडस्ट्रीमध्ये लाँच केले तर आपण नेपोटीझमच्या नावाने का रडतो? प्रत्येक मुलाचे आई-वडील त्याला योग्य ते मार्गदर्शन देत त्यांचे कर्तव्य पार पाडत असतात. हे चुकीचे कसे असू शकते?’ असे सवाल त्यांनी घराणेशाहीच्या नावाने ओरड करणा-यांना केला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.