HB_TOPHP_A_

Bhosari : श्रमजीवी विद्यालयाचे वार्षिक स्नेहसंमेलन आणि पारितोषिक वितरण समारंभ उत्साहात

138

एमपीसी न्यूज – भोसरी येथील श्रमजीवी विद्यालयाचे वार्षिक स्नेहसंमेलन आणि पारितोषिक वितरण समारंभ मोठ्या उत्साहाच्या वातावरण संपन्न झाले.  भोसरीतील अंकुशराव लांडगे नाट्यगृहात दोन सत्रात झालेल्या संमेलनात पूर्व प्राथमिक, प्राथमिक व माध्यमिक विभागातील विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

HB_POST_INPOST_R_A

स्नेहसंमेलनास प्रमुख पाहुणे म्हणून आमदार महेश लांडगे ,भोसरी विधानसभेचे प्रथम आमदार विलास लांडे,राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते विजय कोलते,तळेगाव दाभाडे प्रेस क्लबचे  संस्थापक अध्यक्ष विलास भेगडे,राज्याच्या शिक्षण उपसंचालक मीनाक्षी राऊत,शिक्षक सेनेचे नेते संभाजी शिरसाठ ,नगरसेवक सागर गवळी, नगरसेविका प्रियंका बारसे,,संस्थेचे अध्यक्ष मारुती वाघमोडे, उपाध्यक्ष हेमंत दौंडकर, सचिव नंदकुमार ठाकूर, खजिनदार कारभारी पुंडे,संचालक विश्वनाथ कोरडे, चंद्रकांत कोरडे आदी मान्यवर  उपस्थित होते.यावेळी शालेय स्तरावर घेण्यात आलेल्या क्रीडा व बौद्धिक स्पर्धेत  यश मिळविलेल्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते  पारितोषिके देण्यात आली.

आदर्श माता म्हणून कौसल्या किसन दौंडकर यांना शाल,श्रीफळ,मानपत्र देऊन विलास लांडे आणि विजय कोलते यांच्या हस्ते गौरविण्यात आले. सचिव  नंदकुमार ठाकूर यांनी संस्था राबवित असलेल्या उपक्रमांचा प्रास्ताविकात आढावा घेतला.सांस्कृतिक कार्यक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.बालकलाकारांनी आपल्या कसदार अभिनयाने विविधनृत्ये सादर करून प्रेक्षकांच्या डोळ्यांचे पारणे फेडले.

पारंपरिक लोककलाकृतींना उपस्थितांनी मनमुरादपणे दाद दिली.यावेळी विद्यार्थी,पालक आणि शिक्षकवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.  आपल्या भाषणात महेश लांडगे,विलास लांडे, विजय कोलते यांनी विद्यालय राबवित असलेल्या उपक्रमाचे आणि विद्यार्थ्यांचे कौतुक केले.कार्यक्रमाचे सुत्रसंचालन मृणाली झावरे ,आरजु पठाण, समृद्धी माने यांनी केले.आभार धनंजय कुबडे यांनी मानले.कार्यक्रमाचे नियोजन पुर्व प्राथमिक विभागाच्या प्रमुख सुवर्णा बेलिडकर  प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक बाजीराव राक्षे , माध्यमिक विभागाच्या मुख्याध्यापिका अंजली कुलकर्णी तसेच सीमा खैरनार , सुनंदा हुले आणि सांस्कृतिक  विभागाने केले.

HB_POST_END_FTR-A4
HB_POST_END_FTR-A1

%d bloggers like this: