Pimpri : पिंपरी-चिंचवड लघु उद्योग संघटनेची वार्षिक सर्वसाधारण सभा खेळी-मेळीत

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड लघु उद्योग संघटनेची सन २०१८-१९ या वर्षाकरिता ३९ वी वार्षिक सर्वसाधारण सभा सोमवार ३० सप्टेंबरला संध्याकाळी पाच वाजता संघटनेच्या थरमॅक्स चौक येथील कार्यालयात आयोजित करण्यात आली होती. ही सभा खेळी मेळीच्या वातावरणात पार पडली.

या सभेस संघटनेचे अध्यक्ष संदीप बेलसरे, सचिव जयंत कड, खजिनदार संजय ववले, उपाध्यक्ष संजय जगताप, उपाध्यक्ष विनोद नाणेकर, विजय खळदकर, माजी अध्यक्ष सुरेश म्हेत्रे, संजय सातव, दीपक फल्ले, संजय आहेर, शिवाजी साखरे, प्रमोद राणे, नवनाथ वायाळ, प्रवीण लोंढे स्वीकृत संचालक अतुल इनामदार, सुनील शिंदे, शांताराम पिसाळ, विजय भिलवडे, प्रमोद दिवटे, कैलास भिसे, अशोक अगरवाल, निसार सुतार, बशीरभाई तरसगार, अनिल कांकरिया, शशिकांत सराफ, सुहास केसकर, पांडुरंग वाळूंज, प्रभाकर धनोकार व संघटनेचे सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सभेच्या सुरुवातीला सभेच्या अध्यक्षपदी संदीप बेलसरे यांची निवड करण्यात आली. त्यासाठी संजय सातव यांनी नाव सुचवले, त्यास विजय खळदकर यांनी अनुमोदन दिले. त्यानंतर दिवंगत सभासदांना मौन पाळून श्रद्धांजली वाहण्याचा प्रस्ताव प्रमोद राणे यांनी मांडला. सर्वांनी २ मिनिट मौन पाळून श्रद्धांजली वाहण्यात आली.

त्यानंतर सभेचे अध्यक्ष संदीप बेलसरे व सर्व संचालकांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून सभेची सुरुवात करण्यात आली. त्यानंतर संचालक शिवाजी साखरे यांनी मागील सभेचा इतिवृत्तांताचे वाचन केले. सभेने इति वृत्तांत कायम केला. त्यानंतर खजिनदार संजय ववले यांनी सन २०१८-१९ या वर्षाचा ताळेबंद सादर केला. त्यास सभेने बहुमताने मंजुरी दिली. संघटनेने आजपर्यंत केलेल्या महानगरपालिका, महावितरण, पोलीस प्रशासन, एमआयडीसी या संबंधित विविध कामाचा आढावा सचिव जयंत कड यांनी घेतला.

माजी अध्यक्ष सुरेश म्हेत्रे,यांनी टी -२०१ पुनर्वसन प्रकल्प, महानगरपालिका, प्राधिकरण यांच्या संदर्भात उद्योजकांना भेडसावणाऱ्या समस्याबाबत संघटनेने केलेल्या कार्याचा आढावा घेतला. उपाध्यक्ष संजय जगताप यांनी सन २०१९-२० या वर्षाकरता अंदाज पत्रक मांडले. सभेने त्यास बहुमताने मंजुरी दिली. उद्योजकांच्या प्रश्न उत्तराचा व अडचणीचा विषय घेण्यात आला. यावेळी सभासदांनी विचारलेल्या विविध स्वरूपाच्या प्रश्नांना संचालक मंडळाने सविस्तर उत्तरे दिली.

संचालक प्रमोद राणे यांनी सभेचे सूत्रसंचालन केले. संचालक संजय आहेर यांनी उपस्थित सभासदांचे आभार मानले व कार्यक्रम संपन्न झाल्याचे जाहीर केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.