
Akurdi : मॉडर्न शिशु विद्यामंदिरचे वार्षिक पारितोषिक वितरण उत्साहात

एमपीसी न्यूज- मॉडर्न शिशु विद्यामंदिरमध्ये वार्षिक पारितोषिक वितरण सोमवारी स्थानिक नगरसेवक उत्तम केंदळे व माजी पालक प्राजक्ता निफाडकर यांचे हस्ते संपन्न झाला.

यावेळी संस्थेच्या अमिता किराड व राजीव कुटे, मुख्याध्यापिका संगीता घुले, तृप्ती वंजारे, पांडुरंग मराडे तसेच पालक संघ उपाध्यक्षा वर्षा आजरेकर उपस्थित होते.

उत्तम केंदळे म्हणाले की, शिशु विभागाच्या उपक्रमाचे कौतुक करत पालकांनी आपल्या मुलांना संस्कार करताना सकारात्मक दृष्टीने प्रोत्साहन द्यावे, सर्व स्पर्धा प्रकारात त्यांना सहभागी होण्यासाठी प्रयत्न करावेत, यातूनच भावी सुजाण सक्षम नागरिक तयार होतील.
प्राजक्ता निफाडकर यांनी मराठी भाषा दिना निमित्ताने मार्गदर्शन करत मातृभाषेतून शिक्षणाचे महत्व सांगत पालकांशी संवाद साधला. याप्रसंगी विद्यार्थ्यांचे बक्षिसे देऊन कौतुक करण्यात आले. प्रवीणा कुलकर्णी यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले तर शुभांगी पांचाळ यांनी आभार मानले.
