Pune Accident News : मुंबई बंगळूर महामार्गावर आणखी एक अपघात

ब्रेक फेल कंटेनरने पाच वाहनांना उडवले, पाच ते सहा जण जखमी

एमपीसी न्यूज : मुंबई बंगळूर महामार्गावर आज पहाटेच्या सुमारास झालेल्या दोन वेगवेगळ्या अपघातात तिघांचा मृत्यू झाला होता आणि तिघे जण गंभीर जखमी झाले होते.. असे असताना थोड्याच वेळापूर्वी नवले पुलाजवळ आणखी एक अपघात झालाय. ब्रेक फेल झालेल्या एका कंटेनरने पाच ते सहा वाहनांना उडवले. यामध्ये चार ते पाच जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे. जखमींपैकी एकाची प्रकृती चिंताजनक आहे. 

अपघातग्रस्त कंटेनर हा नवले पुलाच्या दिशेने येत असताना भूमकर पुलाजवळ आल्यानंतर त्याचे नियंत्रण सुटले आणि त्याने समोर चालणाऱ्या दोन कार आणि एक रिक्षासह पाच ते सहा वाहनांना उडवले. यामध्ये चार ते पाच जण जखमी झाल्याची माहिती आहे तर जखमींपैकी रिक्षाचालकाची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती आहे.

सकाळी सकाळी हा अपघात झाल्याने मुंबई बंगलोर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी झाली आहे. वाहतूक पोलीस आणि सिंहगड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे.  त्यातील गंभीर जखमी झालेल्या रिक्षाचालकाला तातडीने रुग्णालयात ॲडमिट करण्यात आले आहे.

आज पहाटे मुंबई बंगळूर महामार्गावरील कात्रज बोगद्याजवळ दोन ट्रकचा भीषण अपघात झाला. या अपघातात चालकासह दोघांचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात इतका भयानक होता की ट्रक च्या केबिन चा अक्षरशः चेंदामेंदा झाला होता. त्यानंतर क्रेनच्या मदतीने हात अडकलेल्या जखमींना बाहेर काढण्यात आले होते.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.