Pimpri : टाटा मोटर्स आणि सिम्बॉयसिस इंटरनॅशनलची व्यवस्थापन कार्यक्रमाची दुसरी बॅच पुण्यात सुरु

एमपीसी न्यूज – सिम्बॉसिसइंटर इंटरनॅशनलच्या (अभिमत विद्यापीठ) सहयोगाने जमशेदपूरमध्ये घेतलेला पदव्युत्तर व्यवस्थापन कार्यक्रम यशस्वी ठला. त्यानंतर  टाटा मोटर्सने त्याची दुसरी बॅच (ईपीजीडीबीएम) पुण्यात सुरू केली.  यामुळे कंपनीचे विद्यापीठासोबत असलेले संबंध अधिक दृढ झाले आहेत.
 
विविध कार्यक्षेत्रांतील व्यवस्थापकांच्या या दुसऱ्या बॅचला कृती, वित्त, जनव्यवस्थापन, पुरवठासाखळी, मार्केटिंग आदी विभागांचा समावेश असलेल्या सर्व समावेशक सामान्य व्यवस्थापन कार्यक्रमातून जाण्याची संधी मिळेल. संस्थेतील व्यवस्थापन कौशल्ये विविध स्तरांवर अधिक टोकदार करण्यावर याचा भर आहे. सहयोगावर आधारित संशोधन कंटेंटचा विकास आणि उद्योग व शिक्षण संस्था यांच्यात ज्ञानाचे आदान प्रदान यांसाठी विविध मार्ग पुरवण्यात सिंबॉयसिस सोबतची भागीदारी मदत करत आहे.
 
कंपनीच्या धोरणात्मक उद्दिष्टांशी सुसंगत असलेल्या या कार्यक्रमाचे लक्ष्य आहे. टाटा मोटर्समधील उदयोन्मुख इंजिनीअर्स व अन्य व्यावसायिकांमधील प्रतिभेचा विकास करणे आणि व्यवस्थापकीय कौशल्यांची जोपासना करणे. ईपीजीडीबीएम कार्यक्रम २४ महिन्यांचा असून, यात ४ सत्र आहेत. यातील अध्यापन शास्त्रात वर्गात संकल्पनांचे अध्ययन आणि त्याचे टाटा मोटर्समधील विविध कार्य क्षेत्रांतील प्रकल्पांमध्ये प्रत्यक्ष उपयोजना यांचा समावेश आहे. इंजिनीअर्सच्या क्षमतांचा विकास करण्यासोबतच आघाडीच्या शिक्षण संस्थेतून व्यवस्थापनाचे शिक्षण घेण्याची त्यांची महत्त्वाकांक्षाही हा कार्यक्रम साध्य करून देणार आहे.
 
पुणे बॅचच्या शुभारंभाच्या वेळी सिंबॉयसिसइंटर नॅशनलच्या (अभिमतविद्यापीठ) प्र-कुलगुरू डॉ. विद्या येरवडेकर उपस्थित होत्या. उत्पादन विभागात काम करणाऱ्या व्याव सायिकांसाठी अनुकूल ठरेल असा खास अभ्यासक्रम आखून टाटा मोटर्ससोबतची भागीदारी दृढ करण्यात डॉ. येरवडेकर यांनी महत्त्वपूर्ण भूमिका पार पाडली आहे.
टाटा मोटर्सचे प्रमुख मनुष्यबळ अधिकारी  गजेंद्र चांडेल या समारंभा दरम्यान म्हणाले, “आज व्यवसायातील वातावरण खूपच गतीशील झाले आहे आणि आपल्या आयुष्याला आकार देण्याच्या प्रक्रिये व चाकोरी बाह्य तंत्रज्ञान व सोशल मीडिया यांचा प्रभाव वाढत आहे. म्हणूनच, जागतिक दर्जाचे, धोरणी तरी ही परिस्थितीशी जुळवून घेणारे, व्यवसायाची अत्यंत टोकदार जाणीव असलेले आणि बाजारपेठेतील बदलत्या परिसंस्थेत आघाडीवर राहण्यासाठी आवश्यक ती कल्पकता असलेले भविष्यकाळासाठी सज्ज मनुष्यबळ तयार करणे आमच्यासाठी महत्त्वाचे आहे. सिंबॉयसिस इंटरनॅशनल सोबतची (अभिमतविद्यापीठ) ही भागीदारी म्हणजे आमच्या व्यवस्थापकांना आपल्या मर्यादा ओलांडून शिक्षण घेण्याची तसेच केस स्टडीज आणि संबंधित अध्यापन क्षमतांचे भांडार तयार करण्याची दोन्ही बाजूने लाभ देणारी संधी आहे. उद्योग व शैक्षणिक संस्थांनी एकत्रितपणे काम करणे म्हणजे कल्पकतेला चालना आणि अधिक आर्थिक वाढीकडे नेणारी मूल्यनिर्मिती आहे. उद्योगांसाठी सज्ज असे मनुष्यबळ विकसित करण्यासाठी आणखी काही शिक्षण संस्थांसोबत सहयोग करार करण्यासाठी आम्ही एकीकडे प्रयत्न करतच आहोत.”
 
आपल्याकडील प्रतिभा सशक्त करण्यासाठी असलेला वाव लक्षात घेत, ही भागीदारी टाटा मोटर्सच्या कर्मचाऱ्यांना त्यांची व्यवस्थापकीय कौशल्ये अधिक विकसित करण्याची संधी देईल. कंपनीला आपल्या कार्यात्मक कौशल्याच्या बांधणीसाठी तसेच कर्मचाऱ्यांना विकासाच्या संधी पुरवण्यात ही भागीदारी मदत करेल.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.