Pimpri : निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आणखी एक तडीपार

एमपीसी न्यूज – निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरात प्रतिबंधक कारवायांचा धडाका सुरुच आहे. मंगळवारी (दि. 15) सांगवी पोलीस ठाण्याच्या हद्दतीतील आणखी एका सराईत गुन्हेगारास एक वर्षासाठी तडीपार करण्यात आले आहे.

अविनाश पतीराज डिमेंटी (वय 25, रा. काटेपुरम चौक, पिंपळे गुरव), असे तडीपार करण्यात आलेल्या सराईताचे नाव आहे.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर साबळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी अविनाश याच्यावर निगडीच्या हद्दीत खून, सांगवीमध्ये खुनाचा प्रयत्न, बेकायदेशीर जमाव करणे आदी गंभीर गुन्हे दाखल आहेत. या गुन्ह्यांच्या जोरावर तो परिसरात दहशत करत असल्याने सांगवी पोलिसांनी सहायक आयुक्त श्रीकांत मोहिते यांच्याकडे त्याच्या तडीपारीची प्रस्ताव पाठवला होता. त्यावर उपायुक्त विनायक ढाकणे यांनी मंगळवारी त्याच्या एक वर्षाच्या तडीपारीचे आदेश दिले आहेत.

HB_POST_END_FTR-A2

Advertisement

Advertisement

You might also like