Pune News : केकेआर आणि दिल्ली कॅपिटल क्रिकेट सामन्यांवर सट्टा घेणाऱ्या आणखी एका बुकीचा पर्दाफाश

एमपीसी न्यूज : पुणे पोलिसांनी आणखी एका बुकीचा पर्दाफाश केला आहे. कोलकाता नाईट रायडर्स आणि दिल्ली कॅपिटल या सामन्यावर सट्टा घेत असताना पोलिसांनी ही कारवाई केली. यापूर्वी पोलिसांनी आयपीएल मधील क्रिकेट सामन्यांवर सट्टा घेणाऱ्या दोन बड्या बुकींना पुण्यातून अटक केली होती. 

राहुल सुभाष पांडे (वय 48) असे अटक करण्यात आलेल्या या बुकीचं नाव आहे. त्याचा स्वतःचा ऑनलाइन लॉटरीचा व्यवसाय आहे. सहकारनगर पोलिसांनी ही कारवाई केली आहे.

याप्रकरणी अधिक माहिती अशी की धनकवडीत आयपीएलवर सट्टा घेतला जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांच्या एका पथकाने धनकवडी येथील राहुल पांडे याच्या घरावर छापा टाकला. यावेळी त्याच्या घरात आयपीएल मधील कोलकत्ता नाइट रायडर्स आणि दिल्ली कॅपिटल या सामन्यावर ऑनलाईन बुकिंग घेतले जात असल्याचे आढळून आले. पोलिसांनी त्याच्या घरातून लॅपटॉप टॅब मोबाईल आणि रोख रक्कम असा एक हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.