Pune : वारजेत आणखी एका तरुणाचा खून; मृतदेह फेकला नदीत

एमपीसी न्यूज – एका 25 ते 30 वर्षीय अज्ञात इसमाचा कोणीतरी निर्घृणपणे खून करून मृतदेह वारजे येथील मुठा नदीमध्ये फेकला आहे. ही घटना काल रविवारी(दि.20) रात्री पावणे 12 च्या पूर्वी घडल्याचे समजत असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोणीतरी अज्ञात इसमाने अंदाजे 25 ते 30 वर्षीय इसमाचा हत्याराने डोक्यात, डोळ्यावर, आणि शरीरावर मारहाण करुन निर्घृणपणे हत्या केली. एवढेच नाही तर पुरावा नष्ट करण्यासाठी अज्ञाताने मृतदेह वारजे येथील मुठा नदीमध्ये फेकून दिला. या घटनेने वारजे परिसरात एकच खळबळ उडाली असून आरोपीचा शोध वारजे पोलीस घेत आहेत. याप्रकरणी अज्ञाताविरुद्ध खुनाचा गुन्हा करण्यात आला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.