Pimpri : स्वाईन फ्ल्यूने आणखी एका महिलेचा मृत्यू

एमपीसी न्यूज – स्वाईन  फ्ल्यूने आणखी एका महिलेचा मृत्यू झाला आहे. पिंपरी-चिंचवड शहरात जानेवारी ते सप्टेंबर या कालावधीत स्वाईन फ्लूने 33 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या शहरातील विविध रुग्णालयांमध्ये 11 रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

पिंपरी येथील 53 वर्षीय महिलेला स्वाईन  फ्ल्यूची लक्षणे आढळल्यावरून मंगळवारी (दि. 9) पिंपरी मधील यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचार सुरु असताना रविवारी (दि. 14) त्यांचा मृत्यू झाला. स्वाईन  फ्ल्यूची लक्षणे आढळताच तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात भरती करावे, तसेच डॉक्टरांचा वेळीच सल्ला घ्यावा. नागरिकांनी योग्य ती खबरदारी घ्यायला हवी, असे आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात येत आहे. सध्या शहरातील विविध रुग्णालयांमध्ये सात रुग्णांना कृत्रिम श्वासोच्छ्वासावर ठेवण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.