Pimpri News : आवास योजनेतील लाभार्थ्यांना कागपत्रे छाननीसाठी आणखी एक संधी

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने राबविणेत येत असलेल्या  प्रधानमंत्री आवास योजनेमध्ये निवड झालेले जे लाभार्थी कागदपत्र छाननीसाठी उपस्थित राहू शकले नाहीत, अशा प्रकल्पासाठीच्या लाभार्थ्यांना 5 एप्रिल ते 7 एप्रिल 2021  पर्यंत कागदपत्रे तपासणीकामी उपस्थित राहण्याचे नियोजन करणेत आले आहे.  तर रावेत प्रकल्पासाठी निवड झालेल्या लाभार्थ्यांना उर्वरीत कागदपत्रे सादर करणेसाठी 20 व 22 एप्रिल 2021 रोजी संधी देण्यात आली आहे.

याबाबतची माहिती महापौर उषा ढोरे, उपमहापौर हिराबाई उर्फ नानी घुले, सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके व आयुक्त राजेश पाटील यांनी दिली.

बो-हाडेवाडी प्रकल्पासाठी निवड झालेल्या व जे लाभार्थी  पहिल्या टप्प्यात उपस्थित राहू शकले नाहीत. त्यांच्यासाठी 8 एप्रिल, 9 एप्रिल आणि  12 एप्रिल 2021  रोजी तपासणी करण्याचे नियोजन करणेत आले आहे. तर बो-हाडेवाडी प्रकल्पातील निवड झालेल्या व तपासणीतील उर्वरीत कागदपत्रे सादर करणेसाठी लाभार्थ्यांनी 23 एप्रिल आणि 26 एप्रिल 2021  रोजी उपस्थित रहावे.

च-होली प्रकल्पातील निवड झालेल्या परंतु कागदपत्रांच्या छाननीसाठी उपस्थित न राहिलेल्या लाभार्थ्यांना 15 एप्रिल 16 एप्रिल आणि 19 एप्रिल 2021 रोजी कागदपत्रे छाननीसाठी उपस्थित राहता येणार आहे.

तर यापूर्वि कागदपत्रे तपासणी झालेल्या मात्र उर्वरीत कागदपत्रे सादर न केलेल्यांना 27, 28  एप्रिल 2021 रोजी आपली कागदपत्रे सादर करणेसाठी मुदत देणेत आल्याची माहिती महापौर उषा उर्फ माई ढोरे  व आयुक्त  राजेश पाटील यांनी दिली. यासाठी लाभार्थ्यांनी झोपडपट्टी निर्मुलन व पुनर्वसन विभाग, चिंचवड याठिकाणी आपली कागदपत्रे छाननीसाठी उपस्थित रहावे, असे आवाहन करण्यात येत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.