Pune : संविधान जाळणाऱ्यांना चोख उत्तर द्या – सुप्रिया सुळे

एमपीसी न्यूज –  दिल्ली येथे संविधान जाळल्याच्या घटनेचे पडसाद देशभरात पहायला मिळत आहेत. पुण्यात ठिकठिकाणी निदर्शने करून या घटनेचा निषेध केला जात आहे. आज सकाळी पुण्यात रिपब्लिकन ऑफ इंडियाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मनुस्मृतीचे दहन करत आरोपींचे नागरिकत्व रद्द करण्याची मागणी केली होती. तर दुसरीकडे गुडलक चौकात ‘प्रोटेस्ट ऑफ फेसबुकर्स’ च्या माध्यमातून निदर्शने करण्यात आले आहेत.

दिल्लीतील जंतरमंतर येथे काही व्यक्तींनी भारतीय संविधान जाळल्याची घटना घडली होती. याचा व्हिडिओ समोर आल्यानंतर या घटनेचा देशभरात निषेध केला जात आहे. पुण्यात गुडलक चौकात झालेल्या निदर्शनात राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे देखील सहभागी झाल्या होत्या. यावेळी बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या “संविधान जाळणे हे दुर्दैव आहे समाज म्हणून हे आपलं अपयश आहे. तर संविधान जाळण्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निषेध करायला हवा होता , पण त्यांनी तस केलं नाही त्यामुळे आपण आधी पंतप्रधानांचा निषेध करायला हवा”. असे म्हणत त्यांनी पंतप्रधानांवर टीका केली.

आजचा दिवस सगळ्यात काळा दिवस आहे त्यामुळे आपण शांततेत रस्त्यावर उतरायला हवं तर संविधानावर बोलणाऱ्यांना आपण शांततेच्या मार्गाने चोख उत्तर द्यायला हवं अस आवाहन देखील सुप्रिया सुळे यांनी केलं.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.