Tulapur : तुळापूर बलिदान स्मरण दिन राईडचे आयोजन, 300 सायकलपटूचा सहभाग

एमपीसी न्यूज  – स्वराज्याचे दुसरे छत्रपती संभाजी महाराज यांच्या बलिदान दिनानिमित्त इन्डो अथलेटिक्स सोसायटीतर्फे नाशिक फाटा ते तुळापूर (Tulapur) अशी दरवर्षी घेण्यात येणारी 60 किलोमीटर सायकलिंग राईडचे आयोजन करण्यात येते.

यंदाचे हे सातवे वर्ष आहे. संपूर्ण महाराष्ट्रातून 300 हून अधिक जणांनी यामध्ये सहभाग घेतला. आरोग्य आणि क्रीडा क्षेत्रामध्ये असणारी अग्रगण्य संस्था इन्डो अथलेटिक्स सोसायटी यांच्यामार्फत दरवर्षी हा उपक्रम राबवण्यात येतो. सर्व सहभागी सायकल स्वार सोबत सकाळी 6 वाजता कासारवाडी नाशिक फाटा येथे जमले होते. उद्योजक अण्णारे बिरादार, डॉ. सुहास माटे, प्रकाश शेडबाले, सीए कृष्णकांत बंसल,  आयएएसचे गणेश भुजबळ, अजित पाटील यांच्यातर्फे झेंडा दाखवून सुरुवात करण्यात आली.

 

गणेश भुजबळ यांनी तुळापूर आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या विषयी माहिती दिली, तसेच सरपंच उपसरपंच राजाराम शिवले, संतोष शिवले तुळापूर ग्रामपंचायत यांचे सहकार्य लाभले. एमआयटी आळंदी येथील विद्यार्थी अभिजीत कडू यांनी छत्रपतींवर पोवाडा सादर केला.

 

सर्व सभासद (Tulapur) भक्ती शक्ती निगडी – नाशिक फाटा – मोशी फाटा – चरोली फाटा – आळंदी – तुळापूर – वढू असा प्रवास केला. पुणे पिंपरी चिंचवड,अहमदनगर, नारायणगाव, उदगीर, सोलापूर तसेच महाराष्ट्राच्या विविध भागातून सायकल प्रेमींनी या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला. यावेळी छत्रपती संभाजी महाराज यांना मानवंदना देण्यात आली.

 

नियोजनामध्ये इंडो ऍथलेटिक सोसायटीचे  गिरीराज उमरीकर, दीपक नाईक, रमेश माने, अजित गोरे, प्रमोद चिंचवडे, अविनाश चौगुले, श्रेयस पाटील, विवेक कडू, अमित पवार, प्रशांत तायडे , स्वप्नील लोढा, मदन शिंदे,  तर कैलास शेठ तापकीर यांनी सूत्रसंचालन केले.

 

Pimpri Chinchwad : पुणे यार्ड रीमॉडेलिंग दरम्यान चिंचवड स्टेशनवर गाड्या थांबवण्याचे आवाहन

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.