Bhosari : दोन सराईत आरोपींना अटक; एक पिस्तूल, दोन जिवंत काडतुसे जप्त

खंडणी / दरोडा विरोधी पथकाची खातेउघड

एमपीसी न्यूज – खंडणी-दरोडा विरोधी पथकाने दोन सराईत गुन्हेगारांना अटक केली. त्यांच्याकडून एक पिस्तूल आणि दोन जिवंत काडतुसे असा एकूण 60 हजार 400 रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.

लखन कुमार गायकवाड (वय 27, रा. बालाजीनगर झोपडपट्टी, भोसरी), जमील उर्फ अब्दुल छुट्टन शेख (वय 43, रा. राहुलनगर, निगडी. मूळ रा. इस्टील गल्ली, जि. बिजनोर, उत्तरप्रदेश) अशी अटक केलेल्या सराईत आरोपींची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बालाजीनगर झोपडपट्टी येथे एक तरुण संशयितपणे थांबला असून त्याच्याजवळ एक पिस्तूल असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार सापळा रचून लखन याला ताब्यात घेण्यात आले. त्याची झडती घेतली असता त्याच्याजवळ एक लोखंडी पिस्टल आणि दोन जिवंत काडतुसे आढळून आले. त्याच्याकडून 60 हजार 400 रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला. यावरून त्याला अटक करून त्याच्याकडे चौकशी केली असता त्याचा पिस्तूल विक्रीसाठी मदत करणारा साथीदार जमील याला देखील निगडी मधून ताब्यात घेण्यात आले.

एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी लेखन याच्यावर खुनाचा प्रयत्न, दरोड्याची तयारी यांसारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत. तसेच जमील याच्या विरोधात देखील भारतीय हत्यार कायद्याप्रमाणे दोन गुन्ह्यांची नोंद आहे.

ही कारवाई अप्पर पोलीस आयुक्त मकरंद रानडे, सहाय्यक पोलीस आयुक्त सतीश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली खंडणी – दरोडा विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुधीर अस्पत, पोलीस उपनिरीक्षक पुरुषोत्तम चाटे, मनीषा दशवंत, पोलीस कर्मचारी अजय भोसले, महेश खांडे, राजेंद्र शिंदे, उमेश पुलगम, नितीन लोखंडे, नितीन खेसे, सुधीर डोळस यांच्या पथकाने केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.