Anti Drug : सार्वजनिक ठिकाणी गांजा ओढल्या प्रकरणी तरुणास अटक

एमपीसी न्यूज – सार्वजनिक ठिकाणी गांजा (Anti Drug) ओढणाऱ्या तरुणाला पोलिसांनी अटक केली. ही कारवाई पिंपरी चिंचवड गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने मंगळवारी (दि. 24 मे) दुपारी काळेवाडी येथे केली.

सचिन सीताराम चौधरी (वय 21, रा. तापकीर मळा चौक, काळेवाडी) असे अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे. पोलीस नाईक दादा रमेश धस (वय 34) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

Pimpri : दारू पिऊन शिवीगाळ करणाऱ्यास जाब विचारल्याने तरुणास बेदम मारहाण

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी चौधरी हा मंगळवारी दुपारी साडेबारा वाजताच्या सुमारास काळेवाडी येथील पवना नदीच्या किनारी गणपती मंदिराच्या पाठीमागील बाजूला आडोशाला गांजा पीत बसला होता. याबाबत माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली. त्याच्या ताब्यातून 100 रुपये किमतीचा सहा ग्रॅम गांजा व इतर साहित्य पोलिसांनी जप्त केले आहे. वाकड पोलीस (Anti Drug) तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.