Pimpri : टेम्पोचा पाठलाग करून साडेतेरा लाखांचा गुटखा जप्त

अमली पदार्थ विरोधी पथकाची सलग दुस-या दिवशी कारवाई

एमपीसी न्यूज – संशयित टेम्पोचा पाठलाग करून एका टेम्पोतून 13 लाख 48 हजार 400 रुपयांचा गुटखा जप्त केला आहे. ही कारवाई आज (गुरुवारी) पहाटे वाकड येथे काळेवाडी फाटा परिसरात करण्यात आली. अमली पदार्थ विरोधी पथकाने सलग दुस-या दिवशी कारवाई केली आहे.

टेम्पोचालक विक्रम पेशोराम भक्तीयारपुरी (वय 29, रा. वैभवनगर, पिंपरी) याला अटक करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वाकड पोलीस ठाण्याच्या हद्दीत गस्त घालत असताना अमली पदार्थ विरोधी पथकाला गुरुवारी पहाटे साडे चारच्या सुमारास काळेवाडी फाटा परिसरात संशयित टाटा एस मिनी टेम्पो दिसला. पोलिसांनी टेम्पोचा पाठलाग करून टेम्पो अडवला. टेम्पोची तपासणी केली असता त्यामध्ये विमल कंपनीचा तब्बल 13 लाख 48 हजार 400 रुपयांचा गुटखा आढळला. पोलिसांनी तात्काळ अन्न व औषध प्रशासन विभागाचे माहिती देऊन कारवाई करत गुटख्यासह वाहन जप्त केले.

ही कारवाई पोलीस आयुक्त आर के पद्मनाभन, अप्पर पोलीस आयुक्त मकरंद रानडे, सहाय्यक पोलीस आयुक्त सतीश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अंमली पदार्थ विरोधी पथकाचे पोलीस निरीक्षक श्रीराम पौळ, उप निरिक्षक वसंत मूळे, पोलीस कर्मचारी प्रदिप शेलार, राजन महाडीक, रमेश भिसे, प्रसाद जंगीलवाड, बि.के.दौंडकर, बाळासाहेब सुर्यवंशी, टी. डी. घुगे, आर डी बांबळे, ए.डी.गारगोटे, प्रदिप गुट्टे यांच्या पथकाने केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.