‘Antim: The Final Truth Teaser : ‘मुळशी पॅटर्न’चा हिंदी रिमेक ‘अंतिम: द फाइनल ट्रुथ’चा दमदार टिझर प्रदर्शित

एमपीसी न्यूज – मराठीत धुमाकुळ घातलेला ‘मुळशी पॅटर्न’चा हिंदी रिमेक करणार असल्याचे सलमान खानने सांगितले होते. त्याच ‘मुळशी पॅटर्न’चा हिंदी रिमेक असलेल्या ‘अंतिम: द फाइनल ट्रुथ’च्या चित्रीकरणास सुरूवात झाली आहे. नुकताच या चित्रपटाचा दमदार टीझर प्रदर्शित झाला आहे.

सलमान खानची भूमिका असलेला ‘अंतिम: द फाइनल ट्रुथ’ या चित्रपटात अभिनेता आयुष शर्मा देखील महत्त्वाची भूमिका साकारणार आहे. या चित्रपटाचा टीझर सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

टीझरची सुरुवात ही सलमान आणि आयुषच्या फायटींग सीनने होते. दरम्यान दोघेही शर्टलेस असल्याचे पाहायला मिळते. आयुषचा एक वेगळा लूक या चित्रपटात पाहायला मिळणार आहे.

‘अंतिम: द फाइनल ट्रुथ’ चित्रपटामध्ये सलमान खान पोलिस अधिकाऱ्याची भूमिका साकारणार आहे तर आयुष गँगस्टरची भूमिका साकारत आहे. हा चित्रपट २०२१मध्ये प्रदर्शित होणार असल्याचं सांगितले जात आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.