Anushka & Virat: अनुष्का आणि विराट लग्नानंतर भेटले फक्त ‘इतकेच’ दिवस

Anushka & Virat: Anushka and Virat met just very few times after the wedding मी जेव्हा विराटला भेटत असे तो फक्त थोड्या वेळाचा टाइमपास असे. आमची ती सुट्टी नसल्यामुळे मला आणि विराटला देखील परत जाण्याची घाई असे.

एमपीसी न्यूज- अनुष्का शर्मा आणि विराट कोहली हे सध्याचे बहुचर्चित आणि बिझी जोडपं. त्यातील एक जण फिल्मी दुनियेतील तर दुसरा क्रिकेट क्षेत्रातील. त्यामुळे ते कायमच आपापल्या ठिकाणी व्यस्त असतात. त्यांचे लग्न पण गाजलेले. इटलीतील एका रिसॉर्टमध्ये मोजक्या उपस्थितांच्या साक्षीने त्यांनी सात फेरे घेतले होते. नंतर अनुष्का तिच्या फिल्ममध्ये व्यग्र होती तर विराट क्रिकेटच्या मॅचेसमध्ये बिझी होता. मात्र सध्याचा लॉकडाऊन हा त्यांच्यासाठी पर्वणी ठरतोय.

नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत अनुष्काने एक धक्कादायक माहिती दिली. ती म्हणाली की, ‘आम्ही लग्नानंतरच्या वर्षात आम्ही आमच्या असाइन्समेंट मध्ये खूपच बिझी होतो. त्यामुळे संपूर्ण वर्षातील फक्त २१ दिवसच एकमेकांसोबत होतो. खरं नाही ना वाटत, पण हे सत्य आहे’.

सर्वसामान्य लोकांची आजकाल लग्नानंतर वर्षातच भांडणे सुरु होतात. कारण एकमेकांसोबत वेळ घालवल्यामुळे चांगली ओळख होते. पण बिच्चारे विरुष्का…त्यांना एकमेकांसोबच वेळच घालवायला मिळाला नाही.

आपली जगावेगळी कैफियत मांडताना अनुष्का पुढे म्हणाली की, ‘मी जेव्हा विराटला भेटत असे तो फक्त थोड्या वेळाचा टाइमपास असे. आमची ती सुट्टी नसल्यामुळे मला आणि विराटला देखील परत जाण्याची घाई असे.

लोकांना असे वाटत असेल की मी किंवा विराट एकमेकांना भेटतो म्हणजे ती आमची सुट्टी असेल. पण वस्तुस्थिती तशी नव्हती. आमच्यापैकी एक जण त्यावेळी कामात मग्न असे.

खरंतर आमच्या लग्नानंतरच्या पहिल्या सहा महिन्यात आम्ही एकमेकांसोबत फक्त २१ दिवसच घालवले. मी अ‍ॅक्चुअली हिशोब केला. म्हणजे मी त्याला परदेशात त्याच्या दौ-यावर जेव्हा भेटण्यासाठी जात असे तेव्हा एखादे जेवण आम्ही एकमेकांबरोबर घेत असू एवढेच. तो आमच्यासाठी बहुमूल्य वेळ असे’.

या लॉकडाऊनच्या काळाबद्दल बोलताना अनुष्का म्हणाली की, ‘मला माहितेय सध्या सर्वचजण एका कठीण प्रसंगातून जात आहेत. त्यांच्या कष्टापुढे आम्हाला जो काही थोडासा त्रास सहन करायला लागला तो काहीच नाही याची मला पूर्ण जाणीव आहे. जगण्याचे मर्म मला या परिस्थितीत खूप चांगल्या प्रकारे कळले आहे’.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.