Narishakti Award : नारी शक्ती पुरस्कारासाठी अर्ज करण्याचे आवाहन

एमपीसी न्यूज – सामाजिक क्षेत्रात ज्या महिलांनी मौलिक कार्य केले आहे, अशा महिला, संस्था व गट याच्या सन्मानार्थ केंद्र शासनामार्फत 8 मार्च जागतिक महिलादिनाचे औचित्य साधून “नारी शक्ती पुरस्कार” देण्यात येतो. या पुरस्कारासाठी दि. 31 जानेवारी 2022 पर्यंत ऑनलाईन प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

विधवा, परितक्त्या, निराधार, अपंग महिलांचे पुनर्वसन अशा कार्यात ज्या महिलांनी जाणीवपूर्वक प्रयत्न केले आहेत अशा महिला, संस्था व गटांना तसेच शैक्षणिक, प्रशिक्षण कार्य, पर्यावरण क्षेत्र, महिला स्वावलंबन, आणि शेती व्यवसाय काबाडकष्ट करणाऱ्या महिलांचे विविध तांत्रिक यंत्राद्वारे ज्या महिलांचे श्रम जाणीवपूर्वक कमी करण्यासाठी प्रयत्न केले अशा महिला संस्था व गट त्याचबरोबर सामाजिक व राजकीय क्षेत्रात महिलांनी अधिक सहभाग घ्यावा यासाठी प्रयत्न केले अशा महिला, संस्था व गट यांनी अर्ज करावेत.

नारी शक्ती पुरस्कारासाठी अर्ज करणाऱ्या महिलेचे वय दि. 8 जानेवारी 2022 रोजी 25 वर्ष पूर्ण असावे. त्याचबरोबर पुरस्कारासाठी अर्ज करणाऱ्या संस्था संबंधित क्षेत्रात किमान 5 वर्ष कार्यरत असाव‌्यात.

या पुरस्कारासाठी केंद्र शासनाच्या www.awards.gov.in या वेबसाईटवर दि. 31 जानेवारी 2022 पर्यंत प्रस्ताव ऑनलाईनच सादर करावेत, अशी माहिती जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी, मुंबई उपनगर यांनी दिली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.