Nashik News : आदिम आदिवासी सांस्कृतिक कला महोत्सवासाठी चित्रफित पाठविण्याचे आवाहन

एमपीची न्यूज : ई-संवाद आणि इन्फिनिटी फाऊंडेशन यांच्या वतीने प्राचिन तसेच कालांतराने लुप्त होत असलेल्या लोक कलांना पुनरुज्जीवित करण्यासाठी तसेच पारंपरिक लोक कलाकारांना जागतिक दर्जाचे व्यासपीठ मिळवून देण्यासाठी ‘आदिम आदिवासीं सांस्कृतिक कला महोत्सव’ आयोजित करण्यात आला आहे.

या महोत्सवात महाराष्ट्राच्या काना-कोपऱ्यातील आदिवासी लोक कलाकारांना आपली प्राचीन कला जसे लोक नृत्य, लोक संगीत, लोक कथा कथन, लोक कविता, लोक नाट्य आदी कला सादर करण्याची संधी मिळणार आहे.

महाराष्ट्रातील कलाकारांनी येत्या १० फेब्रुवारी पर्यंत आपल्या कलेचे प्रात्यक्षिक तयार करून ३ ते ५ मिनिटांची चित्रफित [email protected] किंवा +91-9152002626 या भ्रमणध्वनी क्रमांकावर व्हॉट्सॲप करावी, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.