BNR-HDR-TOP-Mobile

Wakad : मोबाईल दुकानातून अॅपल मोबाईल चोरणारा सीसीटीव्हीत कैद

एमपीसी न्यूज – अॅपल कंपनीचा मोबाईल फोन चोरी करताना मोबाईल चोर दुकानातील सीसीटीव्ही कॅमे-यात कैद झाला आहे. ही घटना शुक्रवारी (दि. 14) सकाळी साडेअकराच्या सुमारास वाकड येथील क्रोमा स्टोअर्स येथे घडली. अज्ञात चोरट्याने 79 हजार रुपये किमतीचा मोबाईल फोन चोरुन नेला.

रवींद्र कालिदास क्षीरसागर (वय 29, रा. चिंतामणी कॉलनी, वाल्हेकरवाडी, चिंचवड) यांनी याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वाकड येथील क्रोमा स्टोअर्स येथे सकाळी साडेअकराच्या सुमारास दुकानांमध्ये मोबाईल पाहण्यासाठी काही ग्राहक आले. त्यामध्ये मोबाईल चोर देखील दुकानात आला. दुकानात येताना तो कुणाशी तरी फोनवर बोलत असल्याचे त्याने भासविले. फोनवर बोलता-बोलता त्याने संपूर्ण दुकानात नजर टाकली. त्याला जो मोबाईल फोन चोरायचा आहे, तो चोरताना कोणीही पाहणार नाही, याची खात्री होताच त्याने मोबाईल फोन खिशात घालून चोरून नेला.

ही घटना दुकानातील कोणाच्याही लक्षात आली नाही. परंतु हा चोरीचा संपूर्ण प्रकार दुकानात लावलेल्या सीसीटीव्ही कॅमे-या कैद झाला. यावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वाकड पोलीस तपास करीत आहेत.

HB_POST_END_FTR-A2

HB_POST_END_FTR-A3