Pune : राजीव गांधी पर्यावरण रत्न पुरस्कारासाठी अर्ज पाठवण्याचे आवाहन

एमपीसीए न्यूज- ‘महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी’ पर्यावरण विभागाच्या वतीने दरवर्षी प्रमाणे स्वर्गीय भारतरत्न राजीव गांधी यांच्या स्मरणार्थ राजीव गांधी पर्यावरण रत्न व राजीव गांधी पर्यावरण भूषण पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे. हा कार्यक्रम 5 जून रोजी जागतिक पर्यावरण दिनानिमित्त देशपातळीवर आणि राज्यस्तरावर होणार आहे.

पर्यावरण जनजागृती क्षेत्रामध्ये ज्यांचे मोठे योगदान आहे, ज्या व्यक्ती व संस्था (शासकीय, निमशासकीय आणि एनजीओ) काम करीत आहेत यांना या कार्यक्रमात गौरविण्यात येईल. संस्थांनी व व्यक्तींनी केलेल्या कामाचा अहवाल त्यासोबत छायाचित्रे, वृत्तपत्रात छापून आलेले लेख अथवा बातम्या या संदर्भात संस्थांनी केलेल्या गौरव सर्व माहिती 20 मे 2018 पर्यंत पाठवावे.

पत्ता : अशोकराव मोरे, अध्यक्ष पर्यावरण विभाग, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी, टिळक भवन, काकासाहेब गाडगीळ मार्ग दादर (प.) मुंबई -400025, फोन- 0022-24301369, 24301301

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.