Dehugaon : तुकोबांच्या पालखी रथासाठी 18 बैलजोड्यांचे अर्ज

एमपीसी न्यूज : – संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यातील रथास बैलजोडी जुंपण्याचा मान मिळावा यासाठी जिल्ह्यातील 18 शेतकऱ्यांनी तर, चौघडा गाडीसाठी 4 असे 22 बैलजोडी मालकांनी अर्ज दाखल केले आहेत.

Pimpri : ओबीसी आरक्षण मागणारी ‘मराठा वनवास यात्रा’ पिंपरी चिंचवड शहरात दाखल

10 जूनला आषाढी वारीसाठी संत तुकाराम महाराज पालखी सोहळा देहूतून (Dehugaon) पंढरपूरकडे प्रस्थान ठेवणार आहे. या सोहळ्यातील मुख्य आकर्षण असलेल्या चांदीच्या रथाला बैलजोडी जुंपण्यासाठी इच्छुक शेतकऱ्यांचे अर्ज मागविले होते. 22 अर्ज प्राप्त झाले आहेत. यात 18 अर्ज रथास बैलजोडी जुंपण्याचा मान मिळावा, यासाठी आहेत. तर, 4 अर्ज चौघडा गाडीसाठी आहेत.

सूरज ज्ञानेश्वर खांदवे (कलवड, लोहगाव), विक्रम भगवान जगताप (वाल्हेकरवाडी, चिंचवड), सागर विलास लोणकर (उत्तमनगर, हवेली), तानाजी तुकाराम दगडे (बावधन, ता. मुळशी), निखिल सुरेश कोरडे (नांदेडगाव, ता. हवेली), संग्राम ऊर्फ रोहन सागर टिळेकर (धायरी, हवेली), गणेश नारायण भुजबळ (टाळगाव, चिखली), जीवन अर्जुन जांभुळकर (हिंजवडी, ता. मुळशी), उमेश सूर्यकांत साखरे (हिंजवडी, ता. मुळशी), महेंद्र बाळकृष्ण झिंजुर्डे (पिंपळे सौदागर), संदीप पोपटराव वाल्हेकर (वाल्हेकरवाडी, चिंचवड), कैलास तुकाराम सातव (वाघोली), ओमराज भानुदास खांदवे (वडूखुर्द, हवेली), प्रशांत प्रकाश शेडगे (भुगाव), बाळकृष्ण बबन साखरे (हिंजवडी, ता. मुळशी), सुरेश दिंगबर मोरे (येलवाडी), बबनराव रमाजी काटे (पिंपळे सौदागर) आणि गुलाबराव आबाजी कुंजीर (पिंपळे सौदागर) यांनी पालखी रथासाठी अर्ज केले आहेत.

तर, सत्यवान ज्ञानेश्वर जैद (चिंबळी, ता. खेड), रोहिदास नाना बोत्रे (येलवाडी, ता. खेड), जालिंदर यशवंत बोत्रे (देहूगाव (Dehugaon), प्रशांत जालिंदर बोत्रे यांनी चौघडासाठी अर्ज केले आहेत.

bull

 

Total
0
Shares
Related Posts
Total
0
Share