Talegaon News : पात्र शिक्षकांना एएम स्केल लागू करा – महाराष्ट्र राज्य कला शिक्षक महासंघाची मागणी

मागण्या मान्य न झाल्यास संघटनेच्या वतीने बेमुदत उपोषण करण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे.

एमपीसीन्यूज : पात्र कला शिक्षकांना ए. एम. स्केल त्वरीत देण्यात यावे, अशी मागणी महाराष्ट्र राज्य कला शिक्षक महासंघाच्या वतीने रयत शिक्षण संस्थेचे सचिव डॉ. विठ्ठल शिवणकर यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

याबाबत संघाचे राज्य उपाध्यक्ष किरण सरोदे, राज्य सहचिटणीस मिलींद शेलार, सुनील शिखरे आदींनी सातारा येथे डॉ. शिवणकर यांना निवेदन दिले.

दरम्यान, मागण्या मान्य न झाल्यास संघटनेच्या वतीने बेमुदत उपोषण करण्यात येईल, असा इशाराही निवेदनात देण्यात आला आहे.

एटीडी नंतर एएम ही शैक्षणिक अर्हता प्राप्त  केलेल्या कला शिक्षकांना प्रशिक्षित पदवीधर वेतनश्रेणी ( ए. एम. स्केल) देय असते.  ही वेतन श्रेणी ते पास झालेल्या दिनांकापासून देण्याची तरतूद शासनाने जीआरमध्ये केली आहे.

तरी सुद्धा बरीच वर्ष रयत शिक्षण संस्थेच्या कला शिक्षकांना त्या वेतन श्रेणी पासून वंचित ठेवण्यात आले आहे.

कला शिक्षकांना एएम वेतन श्रेणी (प्रशिक्षित पदवीधर वेतन श्रेणी) दिली नाही तर संघटनेच्या वतीने बेमुदत उपोषण करण्यात येईल, असा इशारा संघटनेच्यावतीने निवेदनात देण्यात आला आहे.

दरम्यान, संस्थाचालक आणि शिक्षक महासंघाचे पदाधिकारी यांच्यात सकारात्मक चर्चा झाली, असल्याची माहिती किरण सरोदे व मिलींद शेलार यांनी दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.