Pune News : विविध शिष्यवृत्ती योजनांसाठी ‘महाडीबीटी’ पोर्टलवरुन करा ऑनलाईन अर्ज 

एमपीसी न्यूज – विविध शिष्यवृत्ती योजनांसाठी विद्यार्थ्यांनी ‘महाडीबीटी’ पोर्टलवरुन ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. सन 2021-22 करिता शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्याची 31 जानेवारी 2022 अंतिम मुदत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महाविद्यालयाचे कामकाज ऑनलाईन पध्दतीने चालू आहे. त्यामुळे ‘महाडीबीटी’ पोर्टलवरुन ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन उच्च शिक्षण संचालनालयाचे शिक्षण संचालक डॉ. धनराज माने यांनी केले आहे.

उच्च शिक्षण संचालनालयामार्फत राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजना, डॉ. पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता योजना, एकलव्य आर्थिक सहाय्य, गुणवान विद्यार्थ्यांना आर्थिक सहाय्य योजना (कनिष्ठ आणि वरिष्ठ स्तर), राज्य शासनाची दक्षिणा अधिछात्रवृत्ती, शासकीय संशोधन अधिछात्रवृत्ती, जवाहरलाल नेहरु विद्यापीठ शिष्यवृत्ती, राज्य शासनाची खुली गुणवत्ता शिष्यवृत्ती, गणित व भौतिकशास्त्र विषयातील प्रज्ञावान विद्यार्थ्यांना देण्यात येणारी शिष्यवृत्ती, शासकीय विद्यानिकेतन शिष्यवृत्ती, राज्यशासनाची अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती (भाग -2), माजी सैनिकांच्या पाल्यांना आर्थिक सहाय्य, स्वातंत्र्य सैनिकांच्या पाल्यांना आर्थिक सहाय्य अशा राज्य शासन पुरस्कृत 14 शिष्यवृत्ती योजनांची राज्यात अंमलबजावणी करण्यात येते.

आर्थिक वर्ष माहे मार्च 2022 अखेर असल्यामुळे राज्यातील सर्व महाविद्यालयांनी प्रत्येक पात्र विद्यार्थीला शिष्यवृत्तीचा लाभ मिळण्यासाठी प्रयत्न करावेत. तांत्रिक अडचणी निर्माण झाल्यास संचालनालयाच्या [email protected] या ई-मेल पत्त्यावर तसेच 020 – 29707098 व 020 – 26126939 या दूरध्वनी क्रमांकावर किंवा समन्वयक अधिकाऱ्यांशी संपर्क करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी खालील संकेतस्थळावर जा –

https://mahadbtmahait.gov.in/

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.