_MPC_DIR_MPU_III -NEW PUN  21 JUN 2021

Pimpri news: कोविड केअर सेंटरमध्ये मानसोपचार तज्ज्ञांची नियुक्ती करा – दीपक मोढवे

एमपीसी न्यूज – कोरोना बाधित रुग्णांमध्ये प्रचंड भीती असते. त्यामुळे रुग्णालयात दाखल केल्यानंतर संबंधित रुग्ण मानसिकदृष्टया खचलेला असतो. परिणामी, अनेक रुग्णांच्या जीवावर बेतते. रुग्णांना मानसिक आधार देण्याची गरज आहे. त्यासाठी शहरातील कोविड केअर सेंटरमध्ये मानसोपचार तज्ज्ञ नेमावे, अशी मागणी भाजपा वाहतूक आघाडीचे शहराध्यक्ष दीपक मोढवे-पाटील यांनी केली आहे.

_MPC_DIR_MPU_II

याबाबत पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्त राजेश पाटील यांना निवेदन देण्यात आले आहे. त्यामध्ये दीपक मोढवे-पाटील यांनी  म्हटले आहे की, पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासनाच्या वतीने शहरातील सर्वच कोविड केअर सेंटरमध्ये चांगले उपचार देण्याचा प्रयत्न केला जात आहे. कोरोनाची वाढती रुग्णसंख्या आणि उपचारामध्ये दगावणाऱ्यांचे प्रमाण वाढल्यामुळे रुग्णांचे मानसिक स्वास्थ अनेकदा खचलेले पहायला मिळते. परिणामी, संबंधित रुग्णांसह नातेवाईकांचीही चिंता वाढते.
तळेगाव दाभाडे येथील एका खासगी रुग्णालयात अतिदक्षता विभागामध्ये कोरोनावर उपचार घेणाऱ्या एका रुग्णाने गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.

वास्तविक, कोरोनाबाधित रुण आणि नातेवाईकांच्या अनेक तक्रारी असतात. त्यामुळे रुग्णांना आपुलकीने परिस्थिती आणि उपाचार पद्धती समावून सांगीतली पाहिजे. त्यामुळे रुग्णांना तणावमुक्त उपचार घेता येतील. याबाबत महापालिका स्तरावर कार्यवाही करावी, अशी मागणी मोढवे-पाटील यांनी केली आहे. कोविड रुग्णांवर उपचार करणाऱ्या हॉस्पिटल, कोविड केअर सेंटरमधील सोयी-सुविधा, रुगांना उपचार पद्धती, उपचाराची बीले, नातेवाईकांना मिळणारी वागणूक याबाबत शेकडो नागरिक- नातेवाईकांच्या तक्रारी आहेत. रुग्णवाहिका, रेमडीसेवीर इंजेक्शन, प्लाझ्मा याबाबत अनेकदा वादाचे प्रसंग उद्भवत आहेत. सर्वसामान्य नागरिकांनी दाद कुठे मागायची? असा प्रश्न उपस्थित होतो. त्यामुळे प्रशासनाने कोविड रुग्णालय, सेंटरमध्ये तक्रार निवारण कक्ष सुरू करावा, अशी मागणी दीपक मोढवे-पाटील यांनी केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.