chakan : खराबवाडी ग्रामपंचायतीवर प्रशासकाची नियुक्ती

एमपीसी न्यूज –  खराबवाडी ( ता. खेड ) येथील ग्रामपंचायतीवर प्रशासकाची नियुक्ती करण्यात आली आहे. खराबवाडी ग्रामपंचायतीच्या विद्यमान सदस्यांची सुरु असलेली चौकशी, आपसात ठरल्यानुसार पदाचा नियोजित कालावधी पूर्ण झाल्याने सरपंच व उपसरपंचांनी दिलेले राजीनामे या पार्श्वभूमीवर प्रशासकाची नेमणूक करण्यात आली आहे.

लाचखोर तत्कालीन ग्रामविकास अधिका-याची लाच मागितल्या प्रकरणी झालेली उचलबांगडी, पदाचा दुरुपयोग करून ग्रामपंचायतीच्या दोन विद्यमान सदस्यांनी गायरानात बेकायदेशीर विनापरवाना बांधलेल्या घरांमुळे त्यांचे रद्द झालेले सदस्यत्व, ग्रामविकास अधिकारी बाळू मलघे याने लाच मागितल्या प्रकरणी जबाबदार धरून खराबवाडी ग्रामपंचायतीच्या सरपंच, उपसरपंचांसह विद्यमान सदस्यांची झालेली चौकशी, पदाचा नियोजित कालावधी पूर्ण झाल्याने सरपंच व उपसरपंचानी दिलेले राजीनामे, लाचखोर ग्रामविकास अधिकाऱ्याच्या रिक्त झालेल्या जागी नव्याने नेमणूक झालेले नवीन ग्रामविकास अधिकारी व नियोजित सरपंच व उपसरपंच यांची नव्याने नियुक्ती होण्यास झालेला विलंब, यामुळे खराबवाडी     ( ता. खेड ) येथील ग्रामपंचायतीवर प्रशासकाची नियुक्ती करण्यात आली आहे.

_MPC_DIR_MPU_II

अशी आहे पार्श्वभूमी 

एक महिना होऊन देखील सरपंच व उपसरपंच यापैकी कोणाचीच या पदावर नव्याने नियुक्ती झाली नसल्याने खराबवाडी ग्रामपंचायतीवर कोणीच वाली नसल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. सह्यांचा अधिकार कोणाला नसल्याने येथील कामे ठप्प आहेत. येथील कार्यकर्ते विश्वनाथ खंडू केसवड यांनी याबाबत खेडचे गटविकास अधिकारी अजय जोशी यांच्याकडे तक्रार अर्जही केला होता. ग्रामस्थांची कामे मार्गी लागावीत, यासाठी जोशी यांनी तातडीने महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५८ च्या तरतुदीनुसार खराबवाडी ग्रामपंचायतीवर खेडचे विस्तार अधिकारी एस.डी. थोरात यांची प्रशासक म्हणून नियुक्ती केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.