Talegaon Dabhade : पुणे जिल्हा राष्ट्रवादीच्या उपाध्यक्षपदी ॲड नामदेव दाभाडे यांची नियुक्ती

एमपीसी न्यूज : पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उपाध्यक्षपदी ॲड. नामदेव सावळेराम दाभाडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सदर नियुक्तीचे पत्र पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष प्रदीप गारटकर यांचे हस्ते दाभाडे यांना देण्यात आले.

यावेळी पुणे जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष सचिन घोटकुले,मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष बबनराव भेगडे, सुभाष जाधव, युवक अध्यक्ष सुनील दाभाडे व पुणे जिल्ह्यातील सर्व तालुका अध्यक्ष व पदाधिकारी यांच्या उपस्थितीत लोणावळा येथे  जिल्हा सेलच्या बैठकीमध्ये नियुक्तीचे पत्र देण्यात आले.

या पत्राद्वारे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे काम सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहचून पक्ष कार्याला बळकटी द्यावी. असे सूचित करण्यात आले आहे. ॲड दाभाडे हे वडगाव मावळ बार असोसिएशनचे माजी अध्यक्ष ,तर मावळ ऍग्रो या कंपनीचे विद्यमान अध्यक्ष म्हणून कार्यरत आहे. त्यांचे निवडीचे सर्वत्र स्वागत होत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.