Pimpri : पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयात सहाय्यक पोलीस आयुक्त पदावर श्रीकांत मोहिते यांची नियुक्ती

एमपीसी न्यूज – महाराष्ट्र राज्य शासनाच्या गृह विभागातील 18 पोलीस उप अधीक्षक आणि सहाय्यक पोलीस आयुक्तांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये श्रीकांत मोहिते यांची पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयात सहाय्यक पोलीस आयुक्त पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. गृह विभागाने याबाबत आज (गुरुवारी) आदेश जारी केले. मोहिते सध्या राज्य महामार्ग पोलीस, ठाणे येथे पोलीस उपाधीक्षक पदावर कार्यरत होते.

पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयात सध्या सात सहाय्यक पोलीस आयुक्तांची नियुक्ती करण्यात आली आहे. सध्या विशेष शाखा आणि पिंपरी विभागासाठी सहाय्यक पोलीस आयुक्तांची गरज आहे. एकूण सात सहाय्यक पोलीस आयुक्तांपैकी एक सहाय्यक पोलीस आयुक्त अद्याप पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयात दाखल झालेले नाहीत. त्यात आणखी एक नियुक्ती करण्यात आली आहे. हे दोन्ही सहाय्यक पोलीस आयुक्त पिंपरी-चिंचवड पोलिसात दाखल झाल्यास आयुक्तालयाला असलेली सहाय्यक पोलीस आयुक्तांची कमी सध्यातरी पूर्ण होणार आहे.

सहाय्यक पोलीस आयुक्त सतीश पाटील (गुन्हे शाखा), सहाय्यक पोलीस आयुक्त चंद्रकांत अलसटवार (चाकण विभाग), सहाय्यक पोलीस आयुक्त गणपतराव माडगूळकर (देहूरोड विभाग), सहाय्यक पोलीस आयुक्त नीलम जाधव (वाहतूक विभाग), सहाय्यक पोलीस आयुक्त अश्विनी राख-केदार (ऍडमिन), सहाय्यक पोलीस आयुक्त श्रीधर जाधव (वाकड विभाग), सहाय्यक पोलीस आयुक्त राम जाधव यांची सध्या पिंपरी-चिंचवड आयुक्तालयात नेमणूक असून आज सहाय्यक पोलीस आयुक्त श्रीकांत मोहिते यांची देखील नियुक्ती करण्यात आली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.