Pune News : भाजप महिला मोर्चा आय.टी. सेलच्या प्रमुखपदी कल्याणी खर्डेकर यांची नियुक्ती

0

एमपीसी न्यूज : भारतीय जनता पार्टी पुणे शहर महिला मोर्चाच्या आय.टी. सेलच्या प्रमुख पदी कल्याणी खर्डेकर यांची नियुक्ती केल्याची घोषणा महिला मोर्चा अध्यक्ष अर्चना पाटील यांनी केली.

_MPC_DIR_MPU_II

यावेळी शहर अध्यक्ष जगदीश मुळीक व इतर मान्यवर उपस्थित होते. कल्याणी खर्डेकर प्रतिष्ठित आय.टी. कंपनीत सिनीयर बिझनेस अॅनेलिस्ट पदावर कार्यरत असून त्यांनी शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातून बी.टेक.ची पदवी प्राप्त केली आहे.

प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, शहराध्यक्ष जगदीश मुळीक आणि महिला मोर्चा अध्यक्ष अर्चना पाटील यांनी मला जी संधी दिली. त्याचा मी आयटी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी पूरेपूर उपयोग करेन व आय टी क्षेत्रातील महिला कर्मचाऱ्यांना संघटित करण्यावर भर देईन,अशी नियुक्तीनंतर कल्याणी खर्डेकर यांनी प्रतिक्रिया दिली.

यावेळी त्यांनी आयटी प्रकोष्ठची कार्यकारिणी जाहीर केली. या कार्यकारिणीत मेघना लवळेकर, देवयानी नातू, अबोली चांडक,अधिका डोंगरे,अनघा जोशी, श्रुती देशपांडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यावेळी महिला मोर्चा सरचिटणीस आशाताई बिबवे,कांचनताई कुंबरे, रेखाताई चोंधे, गायत्रीताई भागवत यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

You might also like
Leave a comment