Pune News : पीपीपी करीता प्रलंबित तज्ञ सल्लागारांची नियुक्ती ; स्थायी समितीची मान्यता

एमपीसी न्यूज : सार्वजनिक खासगी भागीदारी (पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप पीपीपी) तत्त्वावर १२ रस्ते आणि २ पूल विकसीत केले जाणार आहेत. त्याकरीता तज्ञ सल्लागार नियक्तीसाठी जाहीरात दिल्यानंतर अखेर अंतिम सल्लागार निश्चित करण्यात आल्याची माहिती स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने यांनी पत्रकार परिषदेत दिली. 

पीपीपी तत्त्वावर १२ रस्ते आणि २ पूल विकसीत करण्याचे प्रस्तावित आहे. यामध्ये कल्याणीनगर ते मुंढवा, अॅमेनोरा पार्क टाऊनशिप साडेसतरा नळी ते केशवनगर, मुंढवा ते खराडी दरम्यान १२ रस्ते आणि २ पूलांचा यात समावेश आहे.

दरम्यान सर्व १२ रस्ते आणि २ पूल हे वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघातील असल्यामुळे या प्रस्तावावर टीकेची झोड उठली होती. काही राजकीय पक्षांच्या मर्जीतील आणि निधीदात्या मूठभर बांधकाम विकसकांसाठी हा प्रस्ताव लादला जात असल्याची टीका केली गेली परंतु स्थायी समितीमध्ये सर्वपक्षीय सदस्यांकडून बिनविरोध अर्थपूर्ण मंजुरी दिल्यामुळे या प्रस्तावाची चर्चा रंगली होती.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.