Pune News : मोठ्या पगाराची ऑफर दिल्यानंतर दहा डॉक्टरांची ग्रामीण रुग्णालयात नियुक्ती

एमपीसी न्यूज : पुणे जिल्हा परिषदेने ग्रामीण भागातील कोरोना बाधित रुग्णांवर चांगले उपचार करता यावेत यासाठी एमबीबीएस आणि एमडी डॉक्टरांसाठी देशातील बारा राज्यांमध्ये जाहिरात केली होती. या जाहिरातीला चांगला प्रतिसाद मिळाला असून पहिल्याच दिवशी दहा एमबीबीएस डॉक्टरांना नियुक्तीपत्र देण्यात आले आहेत. 

_MPC_DIR_MPU_II

पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात सध्या मोठ्या संख्येने कोरोना बाधित रुग्ण सापडत आहेत. यासाठी जिल्हा परिषदेने ग्रामीण भागात कोविड केअर सेंटर ही उभारले आहेत. परंतु या रुग्णालयासाठी एमबीबीएस एमडी दर्जाचे डॉक्टर मिळत नव्हते.

त्यामुळे जिल्हा परिषदेने एमबीबीएस डॉक्टर साठी तब्बल 90 हजार रुपये आणि एमडी डॉक्टर साठी तब्बल दीड लाख रुपये पगार देण्याची ऑफर देऊन जाहिरात दिली होती. त्यानुसार आता 10 एमबीबीएस डॉक्टर ग्रामीण रुग्णालयात रुजू झाले आहे. पुढील तीन महिन्यांसाठी या डॉक्टरांच्या नेमणुका करण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.