Vadgaon Maval : राष्ट्रवादी काँग्रेस चित्रपट, साहित्य व सांस्कृतिक विभागाच्या मावळ तालुका उपाध्यक्षपदी विलास सातकर यांची नियुक्ती 

-MPC-FIRST-TOP-BANNER-I

एमपीसी न्यूज : वडगाव मावळ – कान्हे येथील उद्योजक विलास सदाशिव सातकर यांची राष्ट्रवादी काँग्रेस चित्रपट, साहित्य व सांस्कृतिक विभागाच्या मावळ तालुका उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

 राष्ट्रवादी काँग्रेस चित्रपट, साहित्य व सांस्कृतिक विभागाच्या मावळ तालुका अध्यक्षा वंदना तरस यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष बबनराव भेगडे, अखिल भारतीय नाटय परिषद शाखा   तळेगाव दाभाडेचे संस्थापक अध्यक्ष सुरेश धोत्रे यांच्या उपस्थितीत सातकर यांना नियुक्तीचे पत्र दिले. यावेळी विजय पानसरे, अॅड कृष्णा दाभोळे, शितल हगवणे, संतोष साखरे, बाळासाहेब बांगर, संदीप साकोरे, विनोद मांजरेकर, सुदाम तरस, कैलास सातकर, गणेश सातकर, सत्यवान सातकर, कुमार सातकर, अंकुश सातकर आदी मान्यवर उपस्थित होते. सातकर हे हाॅटेल व्यावसायिक असून पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते आणि कुशल संघटक म्हणून सुपरिचित आहेत. ग्रामीण भागातील कलाकारांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील राहण्याचा मनोदय सातकर यांनी यावेळी व्यक्त केला.
-MPC-BOTTOM-BANNER-I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

.