Pimpri News : पीसीसीओई मध्ये मंगळवारी अप्रेंटिस भरती मेळाव्याचे आयोजन

एमपीसी न्यूज : पिंपरी-चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट संचलित पिंपरी-चिंचवड कॉलेज ऑफ इंजीनियरिंग (PCCOE), निगडी येथे मंगळवार दिनांक 10 जानेवारी 2023 रोजी अप्रेंटिस भरती मेळाव्याचे आयोजन केले आहे. भारत सरकारच्या मानव संसाधन विभागा अंतर्गत (Pimpri News) बोर्ड ऑफ अप्रेंटिसशिप ट्रेनिंग (BOAT), वेस्टन रिजन, मुंबईइंडियन सोसायटी ऑफ हीटिंग अंड एअर कंडिशनिंग इंजिनिअर (ISHRAE) कन्फरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्रीज (CII),  टीएसविके आणि महाराष्ट्र ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर्स असोसिएशनचे (MaTPO) यांच्या संयुक्त विद्यमाने या भरती मेळाव्याचे आयोजन करण्यात आलेले आहे. या भरती मेळाव्यामध्ये शंभरहून अधिक कंपन्या सहभागी होणार आहेत.

या भरती मेळाव्यामध्ये डिप्लोमा इंजीनियरिंग, इंजीनियरिंग डिग्री, बीएससी, बीसीएस 2020, 2021, 2022 चे पदवीधर सहभाग घेऊ शकतील. इच्छुक उमेदवारांनी पाच ते दहा बायोडाटा घेऊन पिंपरी-चिंचवड कॉलेज ऑफ इंजीनियरिंग (PCCOE) येथे मुलाखतीस यावे अशी माहिती  बोर्ड ऑफ अप्रेंटिसशिप ट्रेनिंग (BOAT), वेस्टन रिजन, मुंबईचे उपसंचालक एन एन वडोदे आणि पिंपरी-चिंचवड कॉलेज ऑफ इंजीनियरिंगचे डीन व महाराष्ट्र ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर्स असोसिएशनचे (MaTPO) अध्यक्ष डॉ. शितलकुमार रवंदळे यांनी दिली.

सहभागी होणाऱ्या कंपन्या

कोको कोला, एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडिया, टाटा मोटर्स, बजाज ऑटो, जॉन डीअर इंडिया, बॉश, फोर्ब्स मार्शल, ॲटलास कॉपको,  टीव्हीएस, मित्सुबिशी इलेक्ट्रिक, पियाजियो वेहिकल्स, महिंद्रा सीआयइ, केएसबी लिमिटेड, कल्याणी टेक्नोफोर्ज,  जयहिंद इंडस्ट्रीज,  टाटा ऑटोकॉम, फ्लॅश इलेक्ट्रॉनिक्स, डाना इंडिया , आयटीसी लिमिटेड, ब्रिटानिया, एसकेएफ, कायनेटिक आणि अन्य नामांकित कंपन्या.

YCMH News :  मृतदेह अदलाबदली प्रकरणी कंत्राटी कर्मचाऱ्याला कामावरून काढले, एकाची विभागीय चौकशी

अप्रेंटिस भरती मेळावा यशस्वी होण्यासाठी पीसीईटीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्षा पद्‌माताई भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त माजी (Pimpri News)  मंत्री हर्षवर्धन पाटील, कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई, उद्योजक नरेंद्र लांडगे, अजिंक्य काळभोर, पीसीसोओईचे संचालक डॉ. गोविंद कुलकर्णी यांनी मार्गदर्शन केले तसेच उमेदवारांनी या संधीचा योग्य फायदा करून घ्यावा असे आवाहन केले.

कार्यक्रमाचे नियोजन विजय टोपे,  प्रा. ऋषिकेश पांडे, प्रा. अजित शिंदे, प्रा. संतोष शिंदे, प्रा. स्वप्निल सोनकांबळे, मंगेश काळभोर आणि सुमारे 100 विद्यार्थी प्रतिनिधी यांनी केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.