Pune News : पावसाळी पाणी व्यवस्थापन प्रकल्पासाठी निधीसाठी मान्यता

एमपीसी न्यूज – शहराच्या विविध भागांमध्ये पावसाळी पाणी व्यवस्थापन प्रकल्पाअंतर्गत विविध विकासकामे आणि देखभाल दुरुस्तीसाठी सुमारे 36 कोटी 56 लाख रुपयांच्या निधीला स्थायी समितीने मान्यता दिल्याची माहिती अध्यक्ष हेमंत रासने यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.

रासने म्हणाले, शहरातील पावसाळी पाणी व्यवस्थापन प्रकल्पाच्या तिसऱ्या टप्प्याच्या अंतर्गत ही कामे करण्यात येणार आहेत. त्यामध्ये नाला विकसित करणे, कल्व्हर्ट बांधणे, पावसाळी पाण्याच्या ड्रेनेज लाईन टाकणे अशा विकासकामांचा समावेश आहे. कोथरुड, वारजे, बावधन, पाषाण, धानोरी, विश्रांतवाडी, येरवडा, मनोरुग्णालय, विमाननगर, वडगाव शेरी, हडपसर, कोंढवा, शनिवार पेठ, दत्तवाडी, हिंगणे, वडगाव, वाडिया आदी परिसरात ही विकासकामे होणार आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.