Pune News : महापालिकेच्या कमला नेहरु रुग्णालयातील लिक्विड ऑक्सिजन खरेदीला मान्यता

एमपीसी न्यूज – महापालिकेच्या कमला नेहरु रुग्णालयातील मध्यवर्ती ऑक्सिजन कार्यप्रणालीसाठी लिक्विड ऑक्सिजन खरेदी करण्यासाठी स्थायी समितीने मान्यता दिल्याची माहिती अध्यक्ष हेमंत रासने यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.

रासने म्हणाले, क्वॉलीजर्स सर्जिकल्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या निविदेला स्थायी समितीने मान्यता दिली असून, पुढील दोन वर्षांच्या मुदतीसाठी सर्व करांसह रुपये 22.85415 प्रती क्युबिक मीटर (आय. पी.) प्रमाणे 2 लाख 40 हजार क्युबिक मीटरसाठी सुमारे 54 लाख 84 हजार रुपयांचा निधी खर्च करण्यास मान्यता देण्यात आली आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.