Vadgaon maval :मावळ तालुक्यातील ग्रामीण भागातील 13 गावातील नळ पाणीपुरवठा योजनांना मंजुरी 

एमपीसी न्यूज  – मावळ तालुक्यातील ग्रामीण भागातील गावांसाठी 13 नळ पाणीपुरवठा योजनांना मान्यता मिळाल्याने ग्रामीण भागातील पाण्यासाठीची वणवण आता थांबणार असल्याची माहिती आमदार सुनील शेळके यांनी दिली. 

मावळ तालुक्यातील ग्रामीण भागातील पिण्याच्या पाण्याची समस्या सोडविण्यासाठी आमदार सुनील शेळके शासनाकडे पाठपुरावा करत होते. त्यांच्या यशस्वी पाठपुराव्याने 13 पाणी पुरवठा योजनांना प्रशासकीय मान्यता मिळाली आहे.

 टाकवे बुद्रुक 1 कोटी 35 लाख 15 हजार, फळणे 37 लाख 48 हजार, कुसगाव 1 कोटी 8 लाख 78 हजार, अजिवली 1 कोटी 7 लाख 25 हजार, कुरवंडे 57 लाख 57 हजार, वडेश्वर 79 लाख 95 हजार, भोयरे 56 लाख 10 हजार,माऊ 81 लाख 51 हजार, घोणशेत 78 लाख 10 हजार, शिळींब 62 लाख 56 हजार, केवरे- चावसर 49 लाख 67 हजार, तिकोणा 95 लाख 21 हजार, बेलज 18 लाख 21 हजार अशा साडे नऊ कोटी रूपयांच्या या तेरा गावांतील योजनांना जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी मंजुरी दिली.

या योजनेसाठी केंद्र शासन 50 टक्के, राज्य शासन 50 टक्के अशी निधीची उपलब्धता राहणार आहे. तालुक्यातील 184 नळपाणी योजनांचा आराखडा तयार करण्याचे काम युद्धपातळीवर सुरु आहे. ग्रामीण भागांमध्ये शुद्ध व पुरेसे पाणी उपलब्ध व्हावे म्हणून जल जीवन मिशन हाती घेण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.