-MPC-TOP-MOST-BANNER-I

Vadgaon Maval News : नगरपंचायतच्या ऑनलाइन झालेल्या सर्वसाधारण सभेत 66 विषयांना मंजुरी

-MPC-FIRST-TOP-BANNER-I

एमपीसी न्यूज – वडगाव नगरपंचायतच्या शुक्रवारी (दि 17) झालेल्या ऑनलाइन सर्वसाधारण सभेत 66 विषयांना मंजुरी देण्यात आली. दरम्यान ऑफलाइन सभेची मागणी करूनही ऑनलाइन सभा घेतल्याने भाजपच्या नगरसेवकांनी सभेवर बहिष्कार टाकून सभात्याग केला.

नगराध्यक्ष मयूर ढोरे यांच्याअध्यक्षतेखाली व उपनगराध्यक्षा पूजा वहिले, मुख्याधिकारी सुवर्णा ओगले, गटनेते राजेंद्र कुडे, प्रमिला बाफना यांच्या उपस्थितीत झालेल्या या सभेत नगरसेवक सुनील ढोरे, राहुल ढोरे, चंद्रजीत वाघमारे, माया चव्हाण, शारदा ढोरे, पूनम जाधव, सायली म्हाळसकर यांनी सहभाग घेतला.

-MPC-SECOND-TOP-BANNER-I

या सभेत प्रामुख्याने मृत कर्मचाऱ्यांच्या वारसांना अनुकंपा तत्त्वावर नगरपंचायतमध्ये कामाला घेण्याबाबत ठराव मंजूर करण्यात आला असून शहरातील विविध प्रभागांमध्ये रस्ता काँक्रीटीकरण, बंदिस्त गटर, बंदिस्त पाइप गटर, स्ट्रीट लाईट, भूमिगत केबल टाकणे आदी 66 विषयांना मंजुरी देण्यात आली.

सभा तहकूब करून पुन्हा ऑफलाइन सभा घ्यावी –  दिनेश ढोरे यांची मागणी

ऑनलाइन सभेत नगरसेवकांना जनतेचे प्रश्न सविस्तर मांडता येत नाहीत, विषय एकदाच वाचून चर्चा न करता मंजुरी दिली जाते, अत्यावश्यक असलेले विषय न घेता गरज नसलेले विषय घेऊन मंजूर करण्यात येतात. त्यामुळे ऑफलाइन सभा घेण्याची मागणी करण्यात आली होती. परंतु, सभा ऑनलाइनच घेतल्याने सभात्याग करण्याचा निर्णय घेतला असून ही सभा तहकूब करून पुन्हा ऑफलाइन सभा घ्यावी,अशी मागणी गटनेते दिनेश ढोरे यांनी केली आहे.

-MPC-BOTTOM-BANNER-I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

.