Pune : इनामेमळा येथील २६४ सदनिका भाडेकराराने देण्यास मान्यता

एमपीसी न्यूज – घोरपडे पेठ इनामेमळा येथील ट्रान्झिट कॅम्पमधील २६४ सदनिका एसआरए स्किम करिता, टारगेट इन्फ्रा डेव्हलपर्स यांना ३ वर्षे मुदतीकरिता भाडे कराराने देण्यासही सोमवारी सर्वसाधारण सभेत मान्यता देण्यात आली.

खेळासाठी आरक्षित मैदानाच्या जागेवर तात्पूरत्या स्वरुपात सुरू करण्यात आलेल्या या ट्रान्झिट कॅम्पमधील २६४ गाळे, महापालिकेचे भाडे थकविणा-या बांधकाम व्यावसायिकाला दिले जात असल्याचा आरोप यावेळी राष्ट्रवादी व काँग्रेसच्या सदस्यांनी केला़. परिणामी या विषयावरही आरोप-प्रत्यारोपात मतदान घेऊन सत्ताधारी पक्षाने हा विषय बहुमताने मान्य केला़. आता हे सर्व गाळे संबंधित कंपनीला २ हजार २४२ रूपये प्रति महा प्रति सदनिका या दराने तीन वर्षांकरिता देण्यात येणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.