Walhekarwadi : नवीन रिक्षा स्टँड ला मान्यता द्या – बाबा कांबळे

एमपीसी न्यूज – पिंपरी -चिंचवड शहरात वाहतुकीची गरज लक्षात घेता नवीन रिक्षांना परवाना देणे सुरू असल्यामुळे मोठ्या प्रमाणात नवीन रिक्षा
रस्त्यावर आल्या आहेत. पिंपरी-चिंचवड शहरात दहा हजार पेक्षा अधिक नवीन रिक्षा आल्या आहेत. यामुळे पूर्वीचे रिक्षा स्टँड अपुरे पडत असून नवीन
रिक्षा स्टँडना परवानगी द्यावी, अशी मागणी महाराष्ट्र रिक्षा पंचायत अध्यक्ष बाबा कांबळे यांनी केली आहे. तसेच याबाबत परिवहन विभागाकडे पत्रव्यवहाराद्वारे मागणी करण्यात येणार असल्याचेही ते म्हणाले. 

वाल्हेकरवाडी येथे महाराष्ट्र रिक्षा पंचायत संलग्न  वाल्हेकर रिक्षा स्टँडचे उद्घाटन बाबा कांबळे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत
होते. यावेळी विभाग अध्यक्ष अजित बरटे, रिक्षा स्टँड अध्यक्ष रजक शेख, निलेश शिवले, दत्तात्रय गायकवाड, प्रशांत गायकवाड, सत्यवान शिवले, अजय बोबडे आदी उपस्थित होते.

नागरिकांना सुलभ प्रवाशी सेवा देण्यासाठी रिक्षा चालकांनी प्रयत्न करावेत यात त्यांना येणाऱ्या अडचणी बाबत संघटनेचे पूर्ण सहकार्य रिक्षा
चालकांना राहिल परंतु रिक्षा संख्या वाढत असल्यामुळे नवीन रिक्षा स्टँडची आवश्यकता भासत आहे. यामुळे नवीन रिक्षा स्टँडला मान्यता मिळवून
घेण्यासाठी आमचा प्रयत्न सुरू आहे. अनेक ठिकाणी नवीन स्टँड मंजूर व्हावे, असा प्रस्ताव देखील संघटनेच्यावतीने पोलीस आयुक्त आणि परिवहन विभागाकडे सादर करण्यात आला आहे. त्याला मंजुरी मिळवून घेण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत, असे बाबा कांबळे म्हणाले.

श्रावणी सोमवार असल्यामुळे बहुतेक रिक्षा स्टँडवर रिक्षा पूजा निमित्त सत्यनारायण पूजा आयोजित करण्यात आली होती. यावेळी महाराष्ट्र रिक्षा
पंचायत वतीने संस्थापक अध्यक्ष बाबा कांबळे यांनी रिक्षा स्टँडला भेटी दिल्या आणि कार्यक्रमात सहभाग घेतला. चिखली, चिंचवड, पिंपरी, भोसरी, आदी ठिकाणी 30 पेक्षा अधिक रिक्षा स्टॅन्डला बाबा कांबळे यांनी भेट देऊन रिक्षा चालकांच्या कार्यक्रमात सहभाग घेत रिक्षा चालकांचे प्रश्न समजून
घेतले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.