Pimpri : ‘राडारोड्याचा’ विषय मंजूर किंवा ‘दप्तरी’ दाखल करा, मात्र तहकूब ठेवून ‘मांडवली’ करु नका’

शिवसेना गटनेते राहुल कलाटे यांनी सत्ताधा-यांना सुनावले

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या विषय पत्रिकेवरील राडारोड्याचा विषय मंजूर करा किंवा ‘दप्तरी’ दाखल करा; मात्र तहकूब ठेवून ‘मांडवली’ करु नका, असा शब्दात शिवसेना गटनेते राहुल कलाटे यांनी भाजप पदाधिका-यांना सुनावले.  दरम्यान, सत्ताधा-यांनी हा विषय तहकूब ठेवला आहे.  

महापालिकेची जुलै महिन्याची तहकूब सभा आज (शनिवारी) पार पडली. बांधकाम राडारोड्याची विल्हेवाट लावण्याचे कंत्राट दिल्यावर याबाबतचे धोरण निश्चित करण्याच्या विषय महासभेवर होता. यावरुन सत्ताधारी भाजप नगरसेवकांमध्ये मतभेद निर्माण झाले होते. अनेक नगरसेवकांनी प्रशासनावर प्रश्नांची सरबत्ती केली. विविध प्रश्न उपस्थित करत आयुक्त श्रावण हर्डीकर यांना दोनवेळा खुलासा करायला लावला.

सभागृह नेते एकनाथ पवार यांनी सभागृहाच्या तीव्र भावना आहेत. त्यामुळे हा विषय पुढील महासभेपर्यंत तहकूब करण्यात यावा. त्यानंतर बोलताना शिवसेना गटनेते राहुल कलाटे म्हणाले, भाजप नगरसेवकांनी विरोध केल्याने सभागृहनेत्यांना विरोधी पक्षांचे गटनेते असल्याचा आज साक्षात्कार झाला आहे.

महापालिकेच्या विकास कामांची उद्घाटने होताना गटनेत्यांची आठवण होत नाही.  राडारोड्याचा विषय तहकूब करायचा असेल. तर पुन्हा ‘मांडवली’ करायची नाही. त्यासाठी हा विषय दप्तरी दाखल करण्याची मागणी करत विषय तहकूब करायचा, भाजप पदाधिका-यांची मनधरणी झाली की पुन्हा मंजूर करायचा असे चालणार नाही, असा इशारा कलाटे यांनी दिला. तसेच राडारोड्याचा विषय मंजूर किंवा ‘दप्तरी’ दाखल करा, मात्र तहकूब ठेवून ‘मांडवली’ करु नका, असेही त्यांनी सत्ताधा-यांना सुनावले. दरम्यान, सत्ताधा-यांनी हा विषय तहकूब ठेवला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.