Apurva Nemlekar : पाहा विशीत असतानाचा ‘शेवंता’चा घायाळ करणारा ‘लूक’

Apurva Nemlekar: Look at the killing 'look' of 'Shevanta' at her twenties

एमपीसी न्यूज – ‘रात्रीस खेळ चाले’ या मालिकेच्या पहिल्या भागात नेहमी फक्त शेवंताचा उल्लेख असे. खऱ्या अर्थाने शेवंताची या सिरियलमध्ये एन्ट्री झाली ती दुस-या भागात. पण आल्या आल्याच तिने सगळ्यांना खाऊन टाकले. तिच्या नजरेचे गारुड फक्त अण्णांवरच नाही तर सगळ्या प्रेक्षकांवर झाले. आपल्या मादक अदांनी सगळ्यांना घायाळ करणारी ही अभिनेत्री म्हणजे अपूर्वा नेमळेकर!

‘आभास हा’ या मालिकेपासून करिअरची सुरुवात करणारी अपूर्वा नेमळेकर आज प्रेक्षकांच्या दिलाची धडकन बनली आहे. त्यामुळेच तिच्या प्रत्येक लूकची, फोटोंची चाहत्यांमध्ये चर्चा असते. काही दिवसापूर्वी अपूर्वाने तिच्या बालपणीचा फोटो शेअर केला होता. त्यानंतर आता तिने 20 वर्षाची असतानाचा एक फोटो शेअर केला आहे.

सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असलेली अपूर्वा अनेक वेळा ती इन्स्टाग्रामवर काही फोटो शेअर करत असते. या फोटोंमध्ये तिने तिचा 20 वर्षांची असतानाचा एक फोटो शेअर केला आहे. आरस्पानी सौंदर्य लाभलेली अपूर्वा ही तेव्हाही अत्यंत सुंदर असल्याचं या फोटोकडे पाहून लक्षात येतं. या फोटोमध्ये तिचे घारे डोळे अनेकांचं लक्ष वेधत असल्याचं दिसून येत आहे.

अपूर्वाने ‘आभास हा’ या मालिकेतून कलाविश्वामध्ये पदार्पण केलं. या मालिकेनंतर ‘आराधना’, ‘एकापेक्षा एक’,’तू माझा सांगाती’ या मालिकांमध्ये काम केलं. तिचा स्वत:चा ज्वेलरीचा व्यवसाय देखील आहे. तसेच ती उत्तम कुकदेखील आहे. लॉकडाऊनमधील टाईमपास म्हणून तिने अनेक खाद्यपदार्थ सोशल मिडियावर शेअर केले आहेत.

View this post on Instagram

Me at 20 ! Memories ❤️ . . #apurvanemlekar #goodolddays #meat20

A post shared by Apurva Nemlekar (@apurvanemlekarofficial) on

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.