मी आर्किटेक्ट व्यवसायाने आणि छंदाने पण!

आर्किटेक्ट पॉईंट ऑफ व्ह्यू - आर्किटेक्ट उदय कुलकर्णी

मी उदय कुलकर्णी, व्यवसायाने आर्किटेक्ट आणि छंदाने पण! लहानपण कष्टात गेलं. शिक्षणाबरोबर कामही करत होतो. त्यामुळे अगदी भरपूर नाही, तरी थोडा अनुभव पाठीशी होता. त्या बळावर 1992 साली स्वतंत्र कार्य करण्यास सुरूवात केली. प्रथम छोटी घरे आणि इंटीरियरची कामे करण्यास सुरूवात केली. लोकांच्या स्वप्नांना वास्तवाचे स्वरूप देणे, हे फारच आव्हानात्मक वाटू लागले. कधी ग्राहकाचे बजेट असे, तर कधी नसे, कधी त्यांच्या कल्पनांना अफाट खर्च आहे, असे वाटले तर त्यांना समर्पक आणि त्यांच्या बजेटमध्ये बसेल असे पर्याय सुचविले.

प्रकल्प पूर्ण झाल्यावर एक समाधान मिळते ते वेगळेच. घराच्या स्वप्नांना व्यावहारिकतेची जोड देत बंगले, वास्तू प्रकल्प, इंटेरियर, मग हळूहळू इंडस्ट्री, फॅक्टरी अशी कामे करत करत 25 वर्षे सहज उलटून गेली. स्थावर मालमत्तेचे व्हॅल्युएशन हे देखील नवीन काम सुरू केले. अनेक दिग्गज लोक व मोठ्या कंपन्यांबरोबर काम कऱण्याचा योग आला व अनुभवही मिळाला, हे मी स्वतःचे भाग्यच समजतो.

गावठाण भागात एखादा प्रकल्प निर्मितीचे काम अतिशय आव्हानात्मक असते. कमी जागा व अत्यंत दाट वस्तीचा भाग येथे 5.5 गुंठे जागेवर एक प्रकल्प निर्माण करण्याची संधी सोले बंधू यांनी दिली. त्यांच्या वसुधा कन्स्ट्रक्शनने जागा संपादित केली होती. मंगलमूर्ती वाड्याजवळ ही जागा आहे, पश्चिमेकडे नदी व दक्षिणेकडे नियोजित उद्यानाची जागा आहे. याचा फायदा करून घ्यायचा विचार केला. गावठाणात प्रत्येक सदनिकेला, घराला उत्तम हवा आणि उजेड येईल, असे डिझाईन बसविणे, हे मुख्य आव्हान होते. शिवाय येथे दुप्पट एफएसआय मिळणार, त्याचाही योग्य वापर करून घेणे आवश्यक होते. जागेचा योग्य वापर करत. प्रत्येक मजल्यावर वन व टू बीएचकेच्या जास्तीत जास्त सदनिका बसविणे, हा कार्यविचार सुरू झाला. शिवाय सोले बंधूंसाठी स्वतंत्र दोन सदनिका डिझाईन करायच्या होत्या. त्यांच्या प्रायव्हसीला धक्का न लावता इतर सदनिकांनाही या सर्व सोयी उपलब्ध करून द्यायच्या होत्या. बऱ्याच विचारविनिमयानंतर व अनेक स्केच केल्यावर एक स्केच जयंत व शशांक या सोले बंधूंनी मान्य केली. आर्किटेक्ट म्हणून या प्रकल्पातील मोकळ्या जागा व सर्व सदनिकांना जास्तीत जास्त हवा, उजेड कसा मिळेल, याची खबरदारी घेतली आहे. जास्तीत जास्त सदनिका प्रत्येक मजल्यावर डिझाईन केल्या आहेत. सोले बंधूंनी ग्राहकांना जास्तीत जास्त सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत.भरपूर वाहने लावण्याची व्यवस्था, जागा, जास्त पाणी साठविण्यासाठी टाकी, ड्राय बाल्कनी, प्रत्येक सदनिकेला स्वतंत्र गच्ची दिली आहे. वास्तू प्रमाणे स्वयंपाकघर व ओट्याची जागा, पाणी, ड्रेनेज यांची उत्तम व्यवस्था, फायर फायटिंग व्यवस्था उत्तम प्रकारे प्लॅन केली आहे.

सोलर हिटरची व्यवस्था ही उल्लेखनीय सुविधा काळानुरूप उपलब्ध करून दिली आहे. दोन्ही बंधूंसाठी असलेल्या भागात स्वतंत्र लिफ्टची व्यवस्था करण्यात आली आहे. निसर्गाच्या सहवासात हा प्रकल्प उत्कृष्ट होईल, यात शंकाच नाही. लहान-मोठ्या वास्तूंची निर्मिती करायचा सततचा ध्यास असतोच त्यात ही हौशी मंडळी अथवा कुटुंब भेटले तर मनासारखे घरनिर्मितीचा आनंद मिळतो. सेक्टर दोनमध्ये लांडगे कुटुंब असेच हौशी! घर अत्यंत हौसेने व चोखंदळपणे पूर्णत्वास नेले आहे. तीन बेडरूम, हॉल स्वयंपाकघर व सुंदर असे देवघर. अत्याधुनिक साहित्याचा वापर करून अत्यंत सुंदर घर तयार झाले आहे. या प्रकारची वास्तुरचना व इंटेरियर अशा दोन जबाबदाऱ्या चेतन लांडगे यांनी माझ्यावर सोपविल्या होत्या.

सिमेंट शीट, वुडन लिपिंग पट्टी, एसीपी कॉरियान, पेन्टेंड ग्लास अशा विविध आधुनिक वस्तूंच्या योग्य वापराने अत्यंत देखणा प्रकल्प पूर्ण झाला आहे.

– उदय कुलकर्णी

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.