Pashan news: होम क्वारंटाईन आहात? जीवनावश्यक वस्तू, औषधांसाठी ‘या’ नंबरवर संपर्क साधा, घरपोच साहित्य मिळेल

एमपीसी न्यूज – एखाद्या कुटुंबात कोरोनाचा शिरकाव झाला की बाधित व्यक्तींसह इतरांनी पण होम क्वारंटाईन असणे आवश्यक असते. त्यामुळे कुटुंबातील सर्वजण क्वारंटाईन असल्याने जीवनावश्यक वस्तू, औषधे मिळविताना नागरिकांची अडचण होते.

काहीजण नाईलाजने बाहेर पडतात. नागरिकांची ही अडचण लक्षात घेत माजी नगरसेवक सनी निम्हण यांनी पाषाण, औंध, सोमेश्वरवाडी, सुतारवाडी परिसरातील क्वारंटाईन असलेल्या कोरोनाग्रस्त नागरिकांसाठी घरपोच साहित्य पोहोचविण्याचे अभियान हाती घेतले. त्यासाठी 8308123555 या क्रमांकावर संपर्क करण्याचे आवाहन केले आहे.

पुणे परिसरात कोरोनाच्या रुग्णसंख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. दुसऱ्या लाटेत रुग्णवाढीचा आलेख चढता आहे. बाधितांचे प्रमाण जास्त आहे. शहरातील अनेक रूग्ण होम आयसोलेशनमध्ये आहेत. एखाद्या कुटुंबातील सदस्याला कोरोनाची लागण झाली की सर्वांनी होम क्वारंटाईन राहणे आवश्यक असते.

 

सर्वजण क्वारंटाईन झाल्यास जीवनावश्यक वस्तू, औषधे, अत्यावश्यक सेवा मिळण्यासाठी अडचण निर्माण होते. त्यामुळे नाईलाजाने घराबाहेर पडावे लागते. त्यातून कोरोनाचा प्रसार होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे माजी नगरसेवक सनी निम्हण यांनी पाषाण, औंध, सोमेश्वरवाडी, सुतारवाडी परिसरातील कोरोनाग्रस्त नागरिकांसाठी घरपोच साहित्य पोहोचविण्याचे अभियान हाती घेतले आहे.

याबाबत बोलताना माजी नगरसेवक सनी निम्हण म्हणाले,
“एखाद्या कुटुंबात कोरोनाचा शिरकाव झाला कि बाधित व्यक्तींसह इतरांनी पण होम क्वारंटाईन असणे आवश्यक असते. परंतु, बाधित कुटुंबाला आवश्यक गरजांसाठी, औषधांसाठी बाहेर पडण्याची वेळ येते आणि ते बाहेर पडले कि इतरांना धोका संभवतो. हे टाळता यावे यासाठी बाधित कुटुंबाला घरपोच सेवा देणे आवश्यक आहे असे माझ्या लक्षात आले. त्यातूनच होम क्वारंटाईन नागरिकांसाठी घरपोच सेवेचे अभियान सुरु करत आहोत. क्वारंटाईन असलेल्या नागरिकांनो काळजी घ्या, योग्य ते उपचार घ्या, घरी राहा आणि सुरक्षित राहा. तुम्हाला लागणाऱ्या सेवांची जबाबदारी आमच्यावर सोपवावी.

त्यासाठी 8308123555 या क्रमांकावर संपर्क करावा. आम्ही अत्यावश्यक बाबींची सेवा आपल्या घरापर्यंत पोहचवू”.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.