Pune News : लिव्ह-इन-रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या जोडप्यात वाद, तरुणीने गळा घोटून तरुणाला संपवले

एमपीसी न्यूज : स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे ते दोघे जण लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये राहत होते. मात्र त्यांच्यात किरकोळ गोष्टीवरून वाद झाला पण चिडलेल्या तरुणीने गळा घोटून तरुणाचा जीव घेतला. हडपसर परिसरातील भेक्राई नगर मध्ये 29 ऑगस्ट रोजी हा प्रकार घडला. सुरुवातीला या प्रकरणी अकस्मात मृत्यूचा गुन्हा दाखल करण्यात. परंतु शवविच्छेदन अहवालात खुनाचा प्रकार उघडकीस आल्यानंतर संबंधित तरुणी विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. 

सोनल पुरुषोत्तम दाभाडे (वय 34) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. तर रोहिणी रामदास यूनाते (वय 24) असे अटक करण्यात आलेल्या तरुणीचे नाव आहे. हडपसर पोलिस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल आहे.

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, स्पर्धा परीक्षेची तयारी करत असताना या दोघांची ओळख झाली. त्यातून हे दोघेही पुढे फुरसुंगी परिसरात लिव्ह अँड रिलेशनशिप मध्ये राहत होते. मात्र या दोघांच्या दररोज किरकोळ कारणावरून वाद होत असत. 29 ऑगस्ट रोजी देखील त्यांच्यात वाद झाला. रागाच्या भरात रोहिणीने सोनलला अचानक ढकलल्याने तो भिंतीवर आपटला. त्यानंतर तो तोल जाऊन खाली कोसळला. रागाच्या भरात असलेल्या रोहिनी हिने त्यानंतर सोनलचा गळा आवळून खून केला.

दरम्यान हा सर्व प्रकार लपवण्यासाठी तिने सोनलचा अचानक मृत्यू झाल्याची खोटी माहिती त्याच्या नातेवाईकांना आणि पोलिसांना दिली होती. पोलिसांनी सोनलचा मृतदेह शवविच्छेदनासाठी ससून रुग्णालयात पाठवला होता. शवविच्छेदन अहवालात गळा घोटून सोनलचा खून झाल्याचे निष्पन्न झाल्यानंतर पोलिसांनी रोहिणीला ताब्यात घेऊन तिच्याकडे चौकशी केली असता तिने खून केल्याची कबुली दिली.

-MPC-BOTTOM-BANNER-I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

.